गुरुवार, 5 जून 2025

2015 -- मराठी ब्लॉग स्पर्धा -- एबीपी माझा वर

 

7 अप्रैल 2015

नमस्कार मंडळी!

एबीपी माझा’ करतोय मराठीतली एकमेव आणि अभिनव अशी ब्लॉग माझा स्पर्धा. आपण गेल्या वेळी ज्याप्रकारे या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला होतात, तसाच प्रतिसाद यावेळीही अपेक्षित आहे. त्यासाठीच हा ईमेलप्रपंच.

मराठी ब्लॉगिंगचं क्षितीजही आता विस्तारतंय. विविध विषयांना धीटपणे भिडताना मराठी ब्लॉगर्स दिसत आहेत. फक्त स्फूट लेखनंच नाही तरकविताफोटोकथा असेही प्रकार हाताळले जात आहेत. फक्त ललितच नव्हेतर विज्ञानशेतीपरराष्ट्र संबंधकलासाहित्य अशा विशेष विषयांनाही मराठी ब्लॉग्ज आपल्या कवेत घेत आहेत. अशाच मराठी ब्लॉग्ज आणि ब्लॉगर्सचं कौतुक करतोय एबीपी माझा’ ‘ब्लॉग माझा’ या मराठीतल्या एकमेव ब्लॉगिंग स्पर्धेच्या रूपानं.

 तेव्हा मंडळी तुमच्यात दडलेल्या लेखक / लेखिकेला केवळ डायरीफेसबुक किंवा ट्विटर पुरताच मर्यादित ठेवूनका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर नियमित लिहित असाल तर ठिकचनाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू करा.

 काय म्हणालातबक्षिसांचंकायअहोबक्षीसंआहेतंच की! पहिल्या तीन जणांना विशेष पारितोषकं आणि उर्वरीत दहा जणांचा उत्तेजनार्थ गौरव. आता कोणती बक्षीसं आहेत ते गुपित राहूद्या की! शिवायतुमच्या निवडलेल्या ब्लॉगला एबीपी माझाच्या वेबसाईटवर प्रसिद्धी आणि बक्षीस वितरण समारंभ थेट एबीपी माझावर!

 

.....तेव्हा मित्र-मैत्रिणींनो येऊ द्या तुमच्यातल्या लेखक-लेखिकेला जगासमोर!

 

स्पर्धेचं स्वरूप-

 १. ब्लॉग युनिकोड मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी)

 २. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.

 ३. सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे

असतील. त्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देण्यास परिक्षकसंयोजक, ‘एबीपी माझा’ हे

बांधील नसतील. तुमचे प्रवेश हे तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.

 ४. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी blogmajha@gmail.com या ई-मेल अँड्रेसवर ई-मेल करावा.  ज्याततुमचं नावतुमच्या ब्लॉगची लिंकपत्ताव्यवसायदूरध्वनी क्रमोबाईल क्रव ई- मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे.

 ५. या स्पर्धेसाठी कोणतंही शुल्क नाही.

 ६. एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.

 ७. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2015.

 ८. स्पर्धेचा निकाल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल. तसंचसंबंधित

विजेत्यांनाच फक्त ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.

 ९. यानंतर एबीपी माझाच्या खास एपिसोडमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल व पुरस्कार वितरण होईल.

 १०. स्पर्धेचं आयोजननियमावलीअटीबक्षीसंयासंदर्भात कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय

बदल करण्याचे अधिकार एबीपी माझाकडे असतील.

 ११.ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेलतर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचेसिद्ध करणेही स्पर्धकाची जबाबदारी आहे. तुमच्या ब्लॉगद्वारेबौद्धिक संपदा अधिकारकॉपीराईट कायदा यांचा भंग झाल्यासउचलेगिरी आढळल्यास त्या ब्लॉगरचा स्पर्धेतला सहभाग व पारितोषिक मिळाल्यास तेही रद्द करण्यात येईल.


धन्यवाद,

एबीपी माझा टीम

कोई टिप्पणी नहीं: