Saturday, February 28, 2009

संगणकावर मराठी -- शासकीय प्रयत्नांना स्वयं स्फूर्तीने सहभाग

संगणकावर मराठी -- शासकीय प्रयत्नांना स्वयं स्फूर्तीने सहभाग
दि. 30 जाने. 2009 रोजी माझ्या कार्यालयांत श्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली संगणकावर मराठी प्रभावी करण्याबाबत बैठक झाली. त्याचे कार्यवृत्त मी नुकतेच रवाना केले आहे.
पण या निमित्त एकत्र आलेली मंडळी मात्र अजूनही एकमेकांना सल्ला, सूचना व सहयोग देऊन कांहीतरी भरीव करण्याचे टरवीत आहेत आणी सर्वांच्या सर्व ईमेल मला धडाधड येत आहेत.
म्ङणून आता मी त्या इथे चिकटवून माझा ईमेल बॉक्स मोकळा करणार, दुसरा पर्याय नाही.
---------------------श्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्र----------------------
2009/2/27 jitendra
एक प्रश्नोत्तरी ( FAQ ) www.indictrans.in वर ठेवता येईल.
आपल्यापैकी कुणी स्वयंसेवक तयार असल्यास तांत्रिक व्यवस्था करणे शक्य आहे.
आणि त्यासाठी मराठी दिनापेक्षा चांगला दिवस कोणता ?
तसे जाहीर पण करता येईल.
जितेंद्र ------------------
--------------"सुशान्त देवळेकर(Sushant Dev" --Friday, 27 February, 2009 12:15 PM
ही योजना छान वाटते आहे. मला ह्या गटात सहभागी व्हायला आवडेल. मात्र माझं ज्ञान खूपच मर्यादित असल्याने मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.------------------
-----Ajay Bhagwat--Friday, 27 February, 2009 12:41 PM --------जितेंद्र सर, तुमची सुचना ग्राह्य आहे. मला वाटते की, त्या नेविप्र वर सगळ्यांना RW हक्क असल्यास सगळ्यांना प्रश्न विचारता येतील व उत्तरे देता येतील. तशी सोय तिथे करणे शक्य नसल्यास, www.marathishabda.com वर करता येईल. हे एक ड्रूपल वापरण आहे व ते एक चांगले CMS (Content Management System)आहे. मराठी दिनाच्या शुभेच्छा.------------------
-----------"jitendra" ---Friday, 27 February, 2009 1:03 PM
www.marathishabda.com वर "हे कोजळ मराठी शब्द ह्या एकाच विषयाला वाहिलेले असल्यामुळे, फक्त ह्याच एका विषयाची चर्चा येथे होईल" असे स्पष्टपणे म्हटले आहे. www.indictrans.in चा उद्देश तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक हाच आहे. खरे तर या मेल यादीत काही सरकारी मंडळी आहेत तेंव्हा सरकारी आशिर्वादाने , योग्य वेबसाईट ( कोजाळ ) वर हे काम झाले तर उत्तम. तसे प्रयत्न व आव्हान मी करू ईच्छितो.-----------जितेंद्र ----------
------नितीन निमकर---------शहासर,
>>मी अजूनही कोणा सरकारी अधिकीऱ्याचा शोधात आहे की जो लोकाभिमुख धोरण अमलात आणू शकेल. त्यासाठी आवश्यक ती माणसं व यंत्रणा जमवून तिला किमान २-३ वर्षे पोसू शकेल. यात लोकसहभाग प्रचंड मिळू शकेल. सरकारी आशिर्वाद , लोकाभिमुख धोरण व भाषाप्रेमींना स्वातंत्र्य हे महत्वाचे.<<
हो अगदी बरोबर. मग आपणच त्या दिशेने प्रयत्न का करुन नयेत?
>>धोरणांचा पुरस्कार किंवा इतरांची टीका पुरे.<<
हेही अगदी मान्य. माझा हा सगळा इतिहास सांगण्याचा हेतु एवढाच की सर्वांना अडचणीची कल्पना असावी व नवीन मार्ग शोधण्यासाठी विचार मंथन व्हावे आणि नवीन कल्पना व नवे संपर्क प्रस्थापित व्हावेत.
आपला, नितीन निमकर
-------------------------------------------------------
From: jitendra
To: Nitin Nimkar
Cc: Ajay Bhagwat ; arun kulkarni ; leena mehendale ; ed pcra ; gaurimsblc@gmail.com; harekrishnaji@gmail.com; kshirsagar.santosh@gmail.com; marathivikas@gmail.com; nitin_24april@rediffmail.com; pspdombivli@gmail.com; ram.research@gmail.com; shubadey@gmail.com; vasantiv@hpcl.co.in; yogeshpalkar@yahoo.com; kubuniverse@yahoo.co.in; udayrote@yahoo.com; vamanbkale@gmail.com; Swapnil Hajare ; Kanhaiya kale ( कન્હૈযা ਕਾளெ ) ; सुशान्त देवळेकर(Sushant Devlekar) ; अतुल लोंढे
Sent: Saturday, February 28, 2009 11:53:33 AM
Subject: Re: minutes of the meeting dt. 30/1/2009
तुम्ही लिहिले की , "सी डॅकमधील जे इंजिनियर हे काम करतात ते पूर्ण स्वयंसेवीवृत्तीने करतात ?" वगैरे.
मी स्वत: स्वयंसेवीवृत्तीने ( वीजेटीआय मधे)काम करत असतांना , केंद्र सरकारने मला सी डॅक मधे आमंत्रित केले. मी डेप्युटेशन वर रुजू देखिल झालो. परंतु सी डॅकमधील अंतर्गत कारणांमुळे ( उघड किंवा गुपित हितसंवंध, ego problems) तब्बल वर्षभर मला व माझ्या गटाला (पगार घेऊनही ) भाषांतर, फॉंट , व इतर महत्वाच्या बाबींवर काम करता आले नाही. तेंव्हा दोन वर्षाचा डेप्युटेशन चा कालावधी असुन देखिल, मी एक वर्षानंतर काढता पाय घेतला. तेंव्हाच , मुंबईत हे काम सुरू असतांना , वर्ल्ड बॅंकेने पैसै दिले म्हणुन बंगलोर च्या सी डॅक मधे ओपन ऑफिस चे भाषांतर होते झाले . प्रयत्न करुन ही ताळमेळ जमवता आला नाही. emails वर पुरावे मिळू शकतील. मुंबईतील प्रकल्पाची एक मेख होती. इथे झालेले सर्व काम सार्वजनिकच राहणार होते. बंगलोर मधे झालेल्या कामात तशी अट नसेल, कदाचित. वर्ल्ड बॅंके चा पैसाही शेवटी सार्वजनिकच. सार्वजनिक पैसा असा व्यय होत असतांना , RedHat, Novell इ. कंपन्यांनी ओपन ऑफिस चे भाषांतर करून घेतले, व ते विकायला लागले.
सरकारी व सार्वजनिक मालकीचे ( GPL) असते तर लोकांपर्यत्न पोचले असते. परंतु त्यात कुणाचेतरी नुकसान झाले असते. आता कुणाचा तरी फायदा होत आहे.
तुमची खंत मी समजू शकतो.
मी अजूनही कोणा सरकारी अधिकीऱ्याचा शोधात आहे की जो लोकाभिमुख धोरण अमलात आणू शकेल. त्यासाठी आवश्यक ती माणसं व यंत्रणा जमवून तिला किमान २-३ वर्षे पोसू शकेल. यात लोकसहभाग प्रचंड मिळू शकेल. सरकारी आशिर्वाद , लोकाभिमुख धोरण व भाषाप्रेमींना स्वातंत्र्य हे महत्वाचे. धोरणांचा पुरस्कार किंवा इतरांची टीका पुरे.
-जितेंद्र
-----------------------------------
2009/2/28 Nitin Nimkar
माफ करा पण हे ईमेल फारच मोठे झाले आहे. तुम्ही शेवट पर्यंत वाचाल अशी आशा वाटते.
तुमचे मायक्रोसॉफ़्ट बद्दलचे मत मला मान्य. पण याच प्रश्नाची दुसरी बाजूही अशी आहे की मायक्रोसॉफ़्ट इंडियाला आपल्या 30 जानेवारीच्या मिटींगसाठी आमंत्रण देण्यासाठी मी स्वत: मायक्रोसॉफ़्टच्या टर्मिनॉलॉजी ब्लॉगवर याबद्दल लिहीले होते. त्याला त्वरित श्री. Plalle Peterson यांचे अमेरिकेतून उत्तर आले की त्यांनी या सभेमधे सहभागी होण्यासाठी, Mr Pradeep Parappil मायक्रोसॉफ़्ट इंडिया यांना मला संपर्क करण्यास सांगितले होते. पण या सदगृहस्थांनी संपर्कच केला नाही. त्यात शहा सर म्हणतात त्यासारखी व्यावसायिक गणिते का एकूणच मायक्रोसॉफ्ट मधील भारतीय इंजिनियरांची भारतीय भाषांबद्दलची बेफिकीरी हा संशोधनाचा भाग आहे.
आता ओपन सोअर्स सॉफ़्टवेअर मराठीकरणा संबधी विचार केला तर त्यातही हीच बेफिकीरी दिसून येते असे मला खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. मायक्रोसॉफ़्टला जर आपल्याला पर्याय उपल्ब्ध करुन द्यायचा असेल तर तो त्यांच्यापेक्षा जास्त व्यावसायिकतेने आपण केला पाहिजे. पण आजची परिस्थिती अगदी उलट आहे. सी डॅकचे कोणीतरी श्री. रामन जे बंगलोरस्थित आहेत ते मराठीच्या ओपन ऑफिस प्रोजेक्टचे प्रकल्प प्रमुख आहेत. त्यांनाही मी आपल्या मिटींग बाबत लिहीले होते. उत्तर नाही. मराठी ओपन ऑफिसचे मराठीकरण श्री. रामन यांच्या अखत्यारित पुणे सी डॅकमधे चालले होते. मी त्यांच्या ओपन ऑफिस ग्रुपवरती त्याचे मराठीकरण् कसे बरोबर नाही याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण फारसे त्यातून निश्पन्न झाले नाही. त्याच्या व्यतिरिकत अत्ता श्री. संदीप शेंडमेके (मी नाव चुकीच्या पध्दतीन लिहिले असेल ) यांनी उरलेल्या कामाचा गेल्या 5 / 6 दिवसात मराठी करणाच्या कामाचा फडशा पाडला आणि 24 तारखेच्या स्ट्रींग फ्रिजमधे त्यांनी मराठी ढकलून दिले. यामधे हेल्प फाईलचे काम 0% झाले आहे. हे संदीप माझ्या माहितीप्रमाणे रेड हॅटमधे नोकरी करत आहेत. मी स्वत: त्यांचे अयोग्य भाषांतराकडे लक्ष वेधले होते. त्यावर त्यांचे म्हणणे तुम्ही या बाबतीत बग रिपोर्ट लिहा. पण मी अत्ता कसेतरी हे मराठीकरण पुरे करुन देतो. पण सुरवात करतांनाच उत्तम व्यवस्थित वा सुयोग्य रितीने का कराय़चे नाही हे मला न उलगडलेले कोडे. सनने यासाठी आवश्यक असणारी सर्व सॉफ़्टवेअर यंत्रणा फुकट उपलब्ध करुन दिली आहे. पण मराठीसाठी ही यंत्रणा वापरलीच जात नाही. आणखी एक गमतीशीर अनुभव म्हणजे माझ्या एका मित्राने याबाबतीत आक्रमक भाषेत एकदा याबद्दल एके ठिकाणी निषेध नोंदवला. त्यावेळी त्यांच्या एका अमेरिकन माणसाने अगदी छान उत्तर दिले की हे भाषांतराचे काम शेवटी स्वयंसेवी पध्दतीने चालते त्यामुळे त्यांना या बाबतीत आपण फार जबाबदार धरता येणार नाही. मला माहित नाही की सी डॅकमधील जे इंजिनियर हे काम करतात ते पूर्ण स्वयंसेवीवृत्तीने करतात की पगार घेऊन या कामासाठी त्यांना काही काळ या प्रकल्पांवर पाठवले जाते? शेवटी आपल्याला सुयोग्य मराठी सॉफ़्टवेअर मिळणार कसे हा प्रश्न आहे.
चीन, कोरिया, जपान यांचे उदाहरण जर पाहिले तर ते आपल्या भाषेबद्दल अतिशय जागृत आहेत व नेमके काम करण्याची त्यांची परंपरा आहे.
यासाठी खरे म्हणजे संस्थात्मक काम व्हायला पाहिजे आणि ते मराठी प्रेमी समुहानेच करायला हवे. सुदैवाने आपल्याला लायनक्स, ऑपन ऑफिस, मोझिला आणि इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यांचे फ्रेमवर्क वापरुन आपण सुयोग्य मराठी सॉफ़्टॅवेअर तयार करु शकतो. पण हे एकट्याचे दुकट्याचे काम नाही. या साठी महाराष्ट्र शासन, शासनमान्य संस्था, स्वयंसेवी संस्था यापैकी कोणीतरी नेटाने प्रयत्न करायला हवे तरच आय टी चा फायदा आपण सर्वसामान्यांपर्यंत आपण नेऊ शकतो. याचसाठी तुमची कालची एक सातत्याने काम करणार्‍या गटाची सूचना मला खूपच आवडली. तिचा पाठपुरावा करायला हवा.
आपला, नितीन निमकर
----------------------------
मायक्रोसॉफ्ट ला आपण सांगावे लागेल असे मला कधीच वाटले नाही.
त्यांच्या तांत्रिक यशाचे , खरोखर कौतुक करण्याजोगे गुपितच मुळी ग्राहकांना नेमके काय हवे ते समजणे हे आहे.
त्यातील उपायांपैकी किती , केंव्हा व कुठल्या किमतीत देणे याच त्यांचे व्यावसायिक गणित असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. तरीही सरकारी धोरण म्हणून कोणीही का असेना, लोकांना किमान काय सुविधा असाव्यात हे सांगण्यासाठी हा प्रपंच. - जितेंद्र
----------------------------------------
2009/2/27 Ajay Bhagwat
कोणत्याही मायक्रोसॉफ्ट प्रणालीच्या भाषा विषयक काम करणाऱ्या विभागाला Dr. Internationalization हे नाव आहे. ह्या तज्ञांचे काम खालील बाबींवर चालते-
१. लिपी- Unicode, DBCS, वगैरे जे अक्षर संकेत आहेत त्यांचा वापर अनिवार्य करणे
२. दिनांक घडण (मराठी- फॉरमॅट)
३. नांव, पत्ता, पिन, टेलि. नं. घडण
४. चलन घडण व त्यासंबंधीचे सर्व गणन (बेरजा, वजावाक्या, ई.)
५. अंक व गणित
६. सर्व शब्द, संदेश, चुका-संदेश, मदत-माहीती (हेल्प) ह्या सर्व प्रणाली चेहऱ्याचे त्या त्या भाषेत अनुवाद करणे ह्या विभागात जगातील जवळ-जवळ सर्व प्रमुख भाषांचे तज्ञ आहेत- मराठी सुद्धा.
एखाद्या भाषेच्या संदर्भात ज्या काही अडचणी येतात त्या सोडवणे त्यांचे कामच आहे. त्यांना आपल्या सगळ्या अडचणी सविस्तरपणे कळवल्यास त्यांची त्यात नक्कीच मदत होईल. आणि महाराष्ट्र शासनच ही अडचण त्यांना कळवत असेल तर त्या अडचणींकडे लक्ष देणे त्यांचा अग्रक्रम होईल. त्यासाठी इथे कळवावे लागेल- drintl@microsoft.com
माझ्या माहितीनुसार भारतिय (आणि चिनी) भाषांचे बरेच काम हैदराबाद येथील मायक्रोसॉफ्ट मधून होते. तेथील तज्ञांच्या तुकडीला बोलावुन घेउन त्यांना ह्या सगळ्या अडचणी अधिकृतपणे शासनामार्फत देण्यात याव्यात अशी नम्र विनंती.
मराठीच्या अनिवार्य वापरासाठी संगणक कंपन्याना (OEM)सांगणे ही अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे. (आपल्याकडे बरेच जण संगणक ओईएम कडे घेत नाहीत म्हणुन अर्धी लढाई). पण मायक्रोसॉफ्टच खऱ्या अर्थाने हा प्रश्न सोडवू शकते. ओ.एस. इंस्टॉल केल्यानंतर जर वापरकर्त्याने भारतिय प्रमाणवेळ निवडलेली असेल तर त्यानुसार भाषांचा एक प्रॉम्ट सतत वापरकर्त्याला दिसेल अशी एक व्यवस्था ओ. एस. मधे सहज करता येणे शक्य आहे. ह्यामुळे वापरकर्त्याला आपल्या भाषांचे अस्तित्व सतत लक्षात राहील. ही काम मायक्रोसॉफ्टला करणे सहज शक्य आहे.
मायक्रोसॉफ्टेतर ओ.एस. असेल तर (लिनक्स) भाषेविषयक काम हे असंघटीतपणे त्या त्या भाषिकांनी केलेले असते हे आपण जाणतोच. आपल्याकडे लिनक्ससाठी मराठी भाषांतराचे काम हे करतात- Hrishikesh (हृषीकेश मेहेंदळे) [hashinclude@gmail.com] त्यांचे मिशन हे आहे- The mission is to localize KDE (the Linux K Desktop Environment) into Marathi, so it can be adopted into the mainstream without particular knowledge of English.
http://marathi.hrishi.org/
I hope that the information above is useful.
Warm regards, Ajay Bhagwat----------------------------
मायक्रोसॉफ्टने मराठी भाषेसंदर्भात एक प्रोजेक्ट २००४ मधे सुरु केला होता. त्याचे काम आता संपलेले दिसत आहे. मराठी शब्दसुची त्यांनी ह्याद्वारे बनवून ते शब्द सध्याच्या प्रणालीत वापरले जात असावेत.
मुंबईतीलच एक कंपनी -अक्षरमाया.कॉम- त्यांना ह्याकामी मदत करत होती असे त्या कोजळपानावरुन कळते.
http://www.microsoft.com/language/wincg/home.aspx?langid=1102
आपल्या बैठकीच्या मुद्द्यात मायक्रोसॉफ्ट प्रणालीतील मराठी शब्द काहीसे क्लिष्ट असल्याचे चर्चीले गेले होते म्हणुन मी हा संदर्भ पाठवत आहे. त्या शब्दांची जननी इथे आहे-
http://www.microsoft.com/language/wincg/glossary.aspx?s=4&letter=A&langid=1102&filter=0
मायक्रोसॉफ्टला जर पुन्हा ह्याबाबत जाणीव करुन द्यायची असल्यास त्यांना तसे विचारायला हवे. त्या पानावरच्या प्रोजेक्ट सहाय्यक ह्या दुव्यावर टिचकी मारल्यावर amala@aksharmaya.com ही कोजळपेटी उघडते.
---------------------------------------------------------
From: Ajay Bhagwat [mailto:ajaybhagwat@marathishabda.com]
Sent: Friday, February 27, 2009 8:38 PM
FYI- मायक्रोसॉफ्ट ह्या संस्थेमार्फत मराठी व ईतर भारतिय भाषा विकसित करते ---
http://www.bhashaindia.com/Community/CommunityHome.aspx
-------------------------------------------------------------------------------
-------------"Ajay Bhagwat" -- Thursday, 26 February, 2009 11:13 PM
मराठी आकड्याचा MS Excel मधल्या बगबद्दल वाचून धक्काच बसला. मराठी वापरुन MS Excel वापरायची वेळच आलेली नसल्यामुळे मला ह्याची कल्पना नव्हती.
खरं म्हणजे loss of information हा खूप सिरियस बग समजला जातो.
मला जर MS Office च्या संकेतस्थळावर बग रिपोर्टींगची सोय दिसली की, मी तो बग फ़ाईल करेन- जर हा बग आधीच फाईल केलेला नसेल तर. ------------------
-----------"jitendra" -- Thursday, 26 February, 2009 11:23 PM
खरे तर असे अनेक प्रश्न आहेत. एक टीम सतत काम करणे आवश्यक आहे.
मराठी आकड्याचा प्रश्न version specific असेल तर generalized प्रतिरादन अचूक होणार नाही.
मी तश्या प्रकारे तपासून बघू शकलो नाही म्हणून मला माझेच वाईट वाटत आहे.
-जितेंद्र --------------
------नितीन निमकर--------- शहा सर, अगदी मनातले मत मांडलेत. एक टीम सतत काम करणे आवश्यक आहे आणि या टीमने सुध्दा फार तंत्रज्ञान मूलक प्रश्नांकडे जाण्याची गरज नाही. फक्त मराठीचा वापर रोजच्यारोज करतांना येणारे प्रश्न, युनिकोड, विवीध सॉफ़्टॅवेअरचे लोकलायझेशन व शिक्षण या कडेच फक्त लक्ष द्यावे.
मराठी आकड्यांचा प्रश्न मी युनिकोड कडे मांडला होता, त्यावेळी मला प्रश्नाची नेमकी दिशा सापडत नव्हती. त्यांचे उत्तर नेमकी दिशा देणारे आहे असे मला वाटते. मी त्या दृष्टीने प्रयत्नात आहे. त्यांनी दाखवलेल्या दिशेनुसार ही अडचण विंडोजची, पी एच पी ची, किंवा माझ्या मते आपण व्हर्च्युअल सर्व्हर वापरतो त्यामुळे तेथेसुध्दा अपाचे सर्व्हर, किंवा लाइनक्समधेही असू शकते. या संबधी कोणीतरी प्रयोग करुन नेमका बग निश्चित करुन उत्तर शोधायला हवे.त्यांच्या ईमेल लिस्टवर मी आजच हा प्रश्न त्यांनी सुचवल्याप्रमाणे मांडला आहे. युनिकोडचे उत्तर मी खाली उधृत करत आहे.
आपला,
नितीन निमकर
-----Original Message-----
Date/Time: Thu Feb 26 00:00:54 CST 2009
Contact: nvncom@yahoo.com
Name: Nitin Nimkar
Report Type: Other Question, Problem, or Feedback
Opt Subject: Marathi Numbers
Dear Sir,
Marathi is a Unicode compliant language. However, when we type Numbers in this language they appear in Roman in some programs while in some they appear in Marathi. If we are programming in PHP, for example for date, then input given in Marathi like 09/15/2009 or 15/09/2009 is not validated, however if we give the same date in Roman, it is validated without any change in the program. By this I infer that Marathi Numbers are not recognized as numbers.
Marathi Numbers appear in UNICODE table from 0966 to 096F
How to solve this problem.
Regards,
Nitin Nimkar
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
----- Forwarded Message ----
From: Magda Danish (Unicode)
To: "nvncom@yahoo.com"
Sent: Friday, February 27, 2009 3:58:29 AM
Subject: FW: Subj: Marathi Numbers
Dear Nitin Nimkar,
Yours seems to be an implementation issue rather than an encoding problem, but it might have something to do with the way Windows handles script-specific numbers, or it may just be a PHP problem specifically, although it is hard to tell from what you say here.
I'd highly recommend that you subscribe - free of charge - to the Unicode mailing list and post your problem there. Our Unicode forum has over 700 subscribers with various levels of expertise who are more likely to help you than we are qualified to do here at the Unicode office. Please see http://www.unicode.org/consortium/distlist.html.
I hope this is helpful.
Regards,
Magda Danish
Sr. Administrative Director
The Unicode Consortium
650.693.3921
magda@unicode.org
---------------------------------------------------------------------------
--- On Sun, 2/1/09, rammohan research wrote:
Subject: अभिप्राय- संगणकावर मराठीसाठी आयोजित केलेली बैठक
प्रति, श्रीमती. लीना मेहेंदळे,
विषय- अभिप्राय- संगणकावर मराठीच्या वापरासाठी आपण आयोजित केलेली बैठक
महोदया ,
मराठीच्या विकासाचे काम करत असताना युनिकोडचे महत्व पटल्यामुळे युनिकोड-गाथा मुंबई ते गडचिरोली वारक-यांच्या निष्ठेने नेण्याचा आम्ही चंग बांधला होता. साधन-सुविधांसाठी ही युनिकोड पालखी शासनाने उचलून धरावी अशी आमची रास्त अपेक्षा होती. मात्र गेले काही महिने शासनदरबारी आमच्या पदरी निराशाच पडली. माहिती तंत्रज्ञान वर्ष घोषित करणा-या राज्यशासनाची युनिकोडबाबतची अनास्था आणि हेळसांड अक्षम्य आहे. माहिती तंत्रज्ञान खात्याची याबाबतची बेपर्वा वृत्ती मराठीला संगणक-क्रांतीपासून वंचित ठेवणार याची खात्री त्यांच्या उदासिनतेमुळे पटली होती. तरी आम्ही प्रयत्न सुरुच ठेवले होते.
मात्र आपल्या पुढाकाराने ३० जानेवारीला मंत्रालयातील झालेल्या बैठकीत ख-या अर्थाने निराशेचे मळभ दूर झाले. मराठी भाषेला संगणकावर मानाचे स्थान असावे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना करावी या आपल्या अधोरेखित भूमिकेमुळेच आजची बैठक आमच्यासारख्या संस्थांना बळ देणारी ठरली. आजच्या बैठकीतल्या मुद्द्यांचा आपण जरुर पाठपुरावा कराल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो. या बैठकीमुळे समविचारी भाषाप्रेमींना एक व्यासपीठदेखील मिळाले आहे. आपण आणि आदरणीय मधुभाई यांनी या विषयाला चालना दिलीत. आता त्याच्या कालबद्ध आणि एकसूत्री धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही आपणांस सर्वतोपरी सहकार्य करु. यापुढील काळात आमच्या बाजूने ई-मेल गटामार्फत आम्ही आपल्या आणि एकमेकांच्या संपर्कात राहूच. मात्र आजच्या आपल्या चर्चेचे खरे फलित हे येणा-या काळातील परस्पर विचारविनियमातून आखलेला ठोस कृती-कार्यक्रम हाच असेल.
प्रशासकीय पातळीवरील युनिकोडच्या अंमलबजावणीसाठी मराठी अभ्यास केंद्राचे आम्ही सर्व प्रतिनीधी सर्वतोपरी सहकार्य करु. त्यासाठी आपण आम्हाला कधीही संपर्क साधू शकता. पुन्हा एकदा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला शासकीय चौकटीत आणून प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण घेतलेल्या पुढाकारासाठी मराठी अभ्यास केंद्रातर्फे मी आपले आभार मानतो आणि यापुढील टप्प्याच्या कार्यवाहीसाठी आम्ही आपल्यासोबत आहोत अशी ग्वाही देतो.
आपला स्नेहांकीत, राममोहन खानापूरकर,
कार्यवाह, मराठी अभ्यास केंद्र (दू. ९८२०० ४००६६)
सोबत संगणकावर मराठीसाठी-राज्यशासनाकडून अपेक्षा हे टिपण जोडत आहे.
मराठीतून उपलब्ध अनेक सोयी-सुविधांसाठी पुढील लिंक पहा
http://ildc.gov.in/marathi/mdownload2000.htm
----------------------------------------------------------------
from rammohan research
to Leena Mehendale
date Fri, Mar 20, 2009 at 8:48 AM
subject Re: पुढाकारासाठी अभिनंदन
mailed-by gmail.com
hide details 8:48 AM (12 hours ago)
Reply
नमस्कार,
सध्या काही तुरळक जिल्ह्यांसाठी निश्चितच आहेत...उदा. पुणे, ठाणे, चंद्रपूर, नाशिक इ. अजून काही ठिकाणी नेटवर्किंग करावे लागेल..त्यासाठी प्रयत्न सुरु करतो आणि आपणांस कळवू.
निवडणुकांनंतर आपण एक दहा दिवसाचा कार्यक्रम निश्चित करु शकलो तर आम्ही काहीजण स्वखुशीने जिल्हा-तालुक्यांमध्ये युनिकोड आणि संगणकीय मराठीच्या प्रसारासाठी जाऊ...
राममोहन खानापूरकर
2009-03-19 रोजी, Leena Mehendale लिहिले:
तुमच्यकडे प्रत्येक जिल्ह्यासाठी रिसोर्स पर्सन आहेत कां. ते फक्त तुमच्या ओळखीचे असले तरी पुरे.
2009/3/19 rammohan research
नमस्कार मॅडम,
आपण युनिकोड आणि मराठीच्या संगणकीय वापरासाठी जो पुढाकार घेत आहात, तो निश्चितच स्पृहणीय आणि अभिनंदनास पात्र आहे. आम्हा युनिकोडवाद्यांना मराठीच्या संगणकावरील विकासासाठी आपल्याकडून मिळणारे पाठबळ आमचा उत्साह वाढवणारे आहे.
आपणांस अपेक्षित महाराष्ट्रातील संगणक-क्रांतीसाठी मराठी अभ्यास केंद्रातर्फे आम्ही संपूर्ण सहकार्य देऊ याची खात्री बाळगा.
आपला स्नेहांकित
राममोहन खानापूरकर सचिव, मराठी अभ्यास केंद्र
युनिकोड वापरा मराठीतून ई-मेल करा
MS WORD, EXCEL, POWERPOINT कशामधूनही मराठीतून काम करा...विनामूल्य
आजच आपल्या WINDOWS XP मधील युनिकोडचा पर्याय चालू करा
मराठीतून उपलब्ध अनेक सोयी-सुविधांसाठी पुढील लिंक पहा
http://ildc.gov.in/marathi/mdownload2000.htm
MS WORD, EXCEL, POWERPOINT कशामधूनही मराठीतून काम करा...विनामूल्य
आजच आपल्या WINDOWS XP मधील युनिकोडचा पर्याय चालू करा
----------------------------------------------------

Wednesday, February 25, 2009

संगणकावर मराठी टायपिंगसंगणकावर मराठी टायपिंग
सुमारे नव्वद ते नव्व्याण्णव टक्के मराठी किंवा अन्य भारतीय भाषिकांना हे माहीत नाही कि एका युक्ती मुळे मराठी व तत्सम भारतीय भाषांचे टायपिंग शिकायला फक्त अर्धा तास पुरतो.
संगणकाचा सर्वत्र बोलबाला झाल्यावर खूप लोकांनी गरजपुरते एका बोटाने करण्या इतपत इंग्रजी टायपिंग शिकून घेतले आहे. त्यांची संगणकाची भीती मोडलेली आहे. पण त्यांना देखील हे माहीत नाही की त्याच संगणकामध्ये अर्ध्या तासांत मराठी टायपिंग शिकण्याची युक्ती देखील आहे. या युक्तीचे नांव इनस्क्रिप्ट की-बोर्ड ले-आऊट.
इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट मधे सर्व व्यंजने उजव्या बोटांनी व सर्व स्वर डाव्या बोटांनी लिहितात त्यामुळे टायपिंग मधे आपोआप एक लय निर्माण होऊन टायपिंग शिकणे व करणे खूप सोपे जाते.
[पुढील मजकूर वाचण्याआधी शक्य असल्यास ही चित्रफीत पहावी.]

दोन मिनिटांत 20 अक्षरे
संगणकाच्या की-बोर्ड वर मधल्या ओळीतील K व वरच्या ओळीतील I अशी KI ही जोडी पहा. K या अक्षराच्या कुंजीने क, ख, आणि I च्या कुंजीने ग, घ, लिहिता येते. याच प्रमाणे पुढील LO या कुंजींच्या जोडीने त, थ आणि द, ध लिहिता येते. L च्या पुढील दोन कुंजी च, छ, ज, झ साठी तर त्या पुढील दोन ट, ठ, ड, ढ साठी आहेत. K च्या डावी कडील H, Y या कुंजींनी प, फ, ब, भ लिहिता येते. म्हणजे मराठी वर्णमालेची ही 20 अक्षरे शिकायला फारसा वेळ लागत नाही -- दोन मिनिटे पुरतात - याला कारण आपण शाळेतील इयत्ता पहिली मधे घोकलेली क ते ज्ञ ही वर्णमाला आणि या वर्णमालेच्या आधाराने तयार केलेला इनस्क्रिप्ट पद्धतीचा. की-बोर्ड. या पैकी प्रत्येक कठिण अक्षरासाठी (ख, घ, छ, झ, थ, ध ...) कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.
गरज असल्यास या लेखाच्या शेवटी दिलेले कळपाटीचे (की-बोर्ड चे) चित्र पहावे.
पुढल्या 20 स्वरांना अजून दोन मिनिटं
तशीच आपण बाराखडीही घोकलेली असते. त्यापैकी अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ही दहा अक्षरे आणि त्या अक्षरांनी लावायच्या काना मात्रा (अ सोडून) अशा वीस गोष्टींसाठी डाव्या हाताने डावीकडील मधल्या व वरच्या ओळीतील जोडी जोडीने पाच-पाच खटके (कुंजी) वापरतात. त्यांचा क्रम थोडा उलट - सुलट आहे - ओऔ, एऐ, अआ, इई, उऊ असा तो क्रम सोईसाठी लावला आहे. की-बोर्डावर AQ -- ओऔ, SW-- एऐ, DE-- अआ, FR-- इई, GT—उऊ अशी अक्षरे किंवा काना-मात्रा लिहिता येतात.
अशा युक्तीने काकू, बाबू, दादू लिहिण्यासाठी
क (K) + काना (E) + क (K) + ऊकार (T) = काकू
ब (Y) + काना (E) + ब (Y) + ऊकार (T) = बाबू
द (O) + काना (E) + द (O) + ऊकार (T) = दादू
अशी युक्ती आहे.
. अकारान्त अक्षरासाठी अकाराचा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही.
‘ताक’ या शब्दासाठी त (L) + काना (E) + क (K) आणि
‘हूक’ लिहिण्यासाठी ह (U) + ऊकार (T) + क (K) लिहावे लागते.
‘किती’ हा शब्द लिहिण्यासाठी क (K) + इकार (F) + त (L) + ईकार (R) असे लिहायचे असते.
हे इतकं सोप्प आहे की तीन चार वेळा करून याचा सोपेपणा कळला की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो.
काना-मात्रा लिहिण्याऐवजी प्रत्यक्ष तो स्वर लिहायचा असेल तर कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.

माझ्या घरात येणारी पाचवी सहावी शिकलेली पण इंग्रजी न येणारी कामवाली मंडळी किंवा त्यांच्या पाचवी - सहावीत जाणा-या मुलीमुलांना देखील मी ही युक्ति शिकवून पहिल्याच दिवशी त्यांच्याकडून या वीसही अक्षरांच्या बाराखडयांची प्रॅक्टिस करून घेते. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण होतो. संगणक शिकण्यासाठी इंग्रजी येत नसल्याने अडून रहात नाही याचे भानही त्यांना येते.
उरलेली अक्षरे
उरलेल्या 16 अक्षरांपैकी ज्ञ, त्र, क्ष, श्र आणि ऋ ही अक्षरे आकड्यांसोबत ऍडजस्ट केली आहेत तर म, ण, न, व, ल, स, श, ष, य ही अक्षरे खालच्या ओळीत (कांही शिफ्ट की सोबत तर कांही शिफ्ट की शिवाय) आहेत. K शेजारील JU या जोडीने र, ह, ङ, आहेत तर ड च्या पुढे ञ आहे. यांच्या जागा डोक्यांत बसण्यासाठी थोडीशी प्रॅक्टीस लागते. कुणाला 10 मिनिटे पुरतील तर एखाद्याला एक दिवस लागेल. पण त्यांना काना - मात्रा लावण्याची पध्दत आधी सांगितल्याप्रमाणेच आहे.
जोडाक्षर
अकार असलेल्या अक्षरासाठी अ चा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही. त्याऐवजी अकार काढून टाकण्यासाठी त्याचा वापर करतात.
म्हणजे दत्त या शब्दासाठी
दत्त = द (O) + त (L) + अकार काढल्याची खूण (D) + त (L).
यातील D या अच्या खटक्यामुळे त चा पाय मोडला जाऊन जोडाक्षराची तयारी होते. अशा प्रकारे तुमच्या घरी असलेल्या संगणकावर मराठी शिकण्याची ही सोप्पी पध्दत आहे.

भारतीय लेखक कुठे आहेत
एका माहिती पत्रावरून असे दिसून येते की सर्व भारतीय भाषा मिळून इंटरनेटवर टाकलेल्या पानांची संख्या 1 कोटीच्याही खाली आहे - त्याचवेळी इंग्रजी भाषेत मात्र इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या पानांची संख्या पद्म, महापद्म (इंग्लिश भाषेत सांगायचे तर ट्रिलियन्स ऑफ पेजेस) एवढी आहे.
तेंव्हा भारतीय लेखकांनी थोड्याशा प्रयत्नाने मराठी लिपिचे टायपिंग शिकून अन्तर्जालावर (का याला इन्द्रजाल म्हणू या कारण हे ही किती मायावी ! ) धडाधड मराठी वाङ्.‌मय उपलब्ध करून देण्याने आपल्या साहित्य संस्कृतीचे चांगले जतन होऊ शकेल.
पण - परन्तु
आता कोणत्याही युक्ती किंवा जादूच्या मागे कांही तरी पण - परन्तु असतातच आणी कोणत्याही जादूगाराला त्यांचे भान ठेवावेच लागते. या सोप्या की-बोर्डच्या वापरासाठीही लेखकांनी दोन - चार मुद्दे ध्यानांत ठेवले पाहिजेत.
तुमच्याकडील संगणक पेन्टियम जातीचा (586 या चिपचा) असून त्यावर विन्डोज XP ही ऑपरेटिंग सिस्टिम असली पाहिजे. 2000 सालानंतर ज्यांनी संगणक घेतले ते बहुतेक या त-हेचे आहेत. संगणक सुरू करून स्टार्ट - सेटिंग - कण्ट्रोल पॅनेल मधे जाऊन रीजनल ऍण्ड लँग्वेज सेटिंग च्या आयकॉन वर डबल क्लिक केल्याने एक नवीन प्रश्नावली तुमच्या समोर येते. तिथे लँग्वेज च्या प्रश्नावर मला हिन्दीचे (म्हणजेच देवनगरी किंवा मराठीचे) ऑप्शन हवे आहे असे सेटिंग सुरूवातीला एकदा कधीतरी करून घ्यावे लागते.

ते करून झाले की संगणकाच्या खालच्या पट्टीत जो टास्कबार आहे तिथे E (म्हणजे इंग्लिश) हे अक्षर दिसू लागते. विन्डोज मधील वर्ड हा प्रोगाम उघडल्या नंतर टास्कबार वर लेफ्ट क्लिक करून आपल्याला टायपिंग साठी इंग्रजी ऐवजी Hi म्हणजे हिंदी हे ऑप्शन निवडता येते. असे ऑप्शन द्यायचे आणि टायपिंगला सुरूवात करायची.
गुगलच्या जी-मेल वर किंवा याहू-मेल वर आपण याच पध्दतीने मराठीत अगदी सोप्पेपणाने टाईप करू शकतो. फक्त टास्कबार Hi ऑप्शन देण्याचे लक्षांत ठेवायचे. गूगल च्या www.blogspot.com या साइट मार्फत ब्लॉग करायचे असतील, तरी वरील टायपिंगच्या पध्दतीने आपले पुस्तक थेट संगणकावरच लिहिले जाऊ शकते. या ब्लॉगच्या शीर्षकाला मराठी अक्षरांतून नांव देउन शिवाय इंग्लिश अक्षरातूनही द्यावे म्हणजे गूगल सर्च करणा-यांनी मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणत्याही भाषेतून विषय दिल्यास त्यांना तुमचे ब्लॉग सापडतात.

मायक्रोसॉफ्ट वर दबाबतंत्र हवे, ते आणणार कां?
सुरूवातीला सांगितलेली पध्दत वापरून मेनू बार वर हिंदीचे ऑप्शन मिळवणे हे पुष्कळांना कटकटीचे वाटेल पण ते अजिबात कठिण नाही. मायक्रोसॉफ्ट कंपनीला ही सोय बाय डिफाल्ट देता आली असती आणि लेखकांना ही खटपट देखील करावी लागली नसती. आपल्या देशांत मायक्रोसॉफ्ट कंपनी अक्षरश: लाखो संगणक विकते. तरीपण आपले सरकार तुम्हीं बाय डिफाल्ट हे ऑप्शन उघडे ठेवा असे ठणकावून का नाही सांगत? कांही कांही संगणकांना ही सोय पण देत नाहीत, ज्यांना युक्ती माहीत असेल त्यांनी .............. साईट वरून डाउनलोड करून घ्यावी असा कांहीसा उर्णटपणा दाखवला जातो. याला कारण आपल्या गृहखात्यातील राजभाषा व आय्‌टी या दोन्हीं विभागांच्या वरिष्ठ अधिका-यांची भारतीय भाषांबद्दल असलेली तीव्र उदासीनता व अज्ञान (त्यांनी हे करून पाहिलेलेच नसते – खोटं वाटत असेल तर माहिती अधिकाराखाली विचारून पहा.) हे ऑप्शन उघडे ठेवा असे सांगणे तर फारच क्षुल्लक. पण आपल्या सर्वच भारतीय भाषांबाबत संगणकावर जे अनंत गोंधळ चालतात त्यापैकी कुठलाच गोंधळ ठणकावून सुधारण्याची इच्छाशक्ती शासकीय अधिका-यांकडे दिसून येत नाही.
त्यामुळेच, म्हणजे आपल्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे शिरजोर होऊन मायक्रोसॉफ्टने एक चलाखी अजून केलेली आहे. विन्डोज XP वापरणा-या प्रत्येक संगणकात एक किंवा दोनच भारतीय भाषा ते बसवतात. त्यामुळे एखाद्या संगणकांत हिंदी-मराठी नसेल आणी बंगालीच असेल किंवा मल्याळीच असेल असेही होऊ शकते. अशा वेळी आपल्या विक्रेत्याकडे आग्रह धरून मराठी ऑप्शन मिळवून घ्यावे.
खरे तर इन्सक्रिप्ट ही सिस्टिम भारत सरकारच्या सी-डॅक या संस्थेने सुमारे 20 वर्षांपूर्वी तयार केली. परंतु तिची किंमत ठेवली रू.15,000/- च्या पुढे. त्यामुळे सोपी असूनही ती कोणालाच वापरता आली नाही. यावरून आपल्या सरकारांचे राष्ट्रभाषा किंवा राजभाषेवरील प्रेम (?) समजून येते.

विन्डोज विकणा-या मायक्रोसॉफ्टने देखील याचे फॉन्टस उपलब्ध करून देतांना खूप तांत्रिक अडचणी निर्माण करून ठेवल्या होत्या. शेवटी लीनक्स या ओपन सिस्टिम वाल्यांनी या पध्दतीची महती ओळखून स्वत:च Unicode वर ही पध्दत वापरून ते सर्व फॉन्टस लीनक्स व गुगल वर उपलब्ध करून दिले तेंव्हा स्वतःची भारतीय बाजारपेठ टिकवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने त्यातील कांही सुविधा देऊन टाकल्या. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी प्रत्येक काम मार्केट, प्रॉफिट, विक्री या तत्त्वावर करते. या उलट लीनक्स चे तत्त्व आहे की प्रत्येकाने आपण निर्माण केलेली नवीन सोय त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून जगाला मोफत उपलब्ध करून द्यावी. याचसाठी त्यांची सिस्टिम झपाट्याने वाढत आहे व त्यांचे तत्त्वज्ञान मान्य असणारे त्यांत भर टाकीत आहेत.
इनस्क्रिप्टची अजून एक जादू
इनस्क्रिप्ट हा एकच लेआऊट (म्हणजे कीज वापरण्याची पध्दत) सर्व भारतीय भाषांना चालतो कारण तो संस्कृतजन्य वर्णमालेवर आधारीत आहे. त्यामुळे या एकाच लेआऊट वर सर्व भारतीय लिपिंचे ऑप्शन उपलब्ध होण्यास कांहीही अडचण नाही. विन्डोजची ऑपरेटिंग सिस्टिम न वापरता हल्ली कांही जण लिनक्स ही ओपन सिस्टिम वापरतात. त्यांच्याकडे ही सर्व सुविधा बाय डिफॉल्ट उपलब्ध आहे. त्यांच्याकडेही की बोर्ड वर मराठी टायपिंग याच पध्दतीने होते, शिवाय मोजक्या लिपींची कटकट उद्भवत नाही. भारतात एकूण नऊ लिपी वापरल्या जातात पण सर्वांची वर्णमाला सारखीच आहे व त्या सर्व लीनक्स वर उपलब्ध आहेत.

एकूण तीन उपाय
अशा प्रकारे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम वापरणे, विन्डोज XP वर हिंदी ऑप्शन टाकून घेणे या खेरीज तिसरा उपाय आहे जो जुन्या संगणकांना देखील चालू शकतो, तो म्हणजे आपल्या संगणकावर - इझम किंवा लीप ऑफिस हे सॉफ्टवेअर बसवून त्यांच्या मार्फत वरील इनस्क्रिप्ट की बोर्ड ले - आऊट वापरणे. सदरहू इझम व लीप ऑफिस ही दोन्ही सॉफ्टवेअर सीडॅक या संस्थेने सुमारे 15 वर्षापूर्वी बाजारांत आणली असून इतकी वर्षे लोकांना सहजासहजी व अत्यल्प किंमतीत उपलब्ध झाला नाही व अजूनही होत नाही या बद्दल सर्व लेखकांनी एकत्रित आवाज उठवला तर कांही होऊ शकेल असे वाटते.
भारतीय भाषांमधील संगणक वापरातील इतर गोंधळांबाबतही आवाज उठवण्याची गरज आहे. मात्र लीनक्सच्या धडाक्यामुळे इनस्क्रिप्ट लेआऊट आता या वेगळ्या पध्दतीने उपलब्ध झाला आहे. तसेच लीनक्स आणि गूगल ने पुढाकार घेतल्यामुळे भारतीय लेखकांना वरील प्रमाणे सोप्या पध्दतीने भारतीय भाषा लेखन शक्य होत आहे. त्यामुळे आता मराठी मधे धपाधप ब्लॉग तयार करून अंतर्जालावर मराठी पानांची संस्था वाढवण्यासाठी सर्व मराठी लेखकांनी मोहीम उघडणे शक्य आहे.


हाच लेख थोड्या विस्ताराने महाराष्ट्र शासनाच्या खालील लिंक वर वाचता येईल.
http://gad.maharashtra.gov.in/marathi/dcmNew/news/bin/inscript-typing.pdf
दिनांक 11.11.09 रोजीचा अपडेट --
नुकतेच आपण कांहीतरी साध्य केले ते असे --
सीडॅक या भारत सरकारच्या कंपनीचे मतपरिवर्तन करण्याचे घूप प्रयत्न झाल्यानंतर आता त्यांच्या साईटवरून मराठी आयलीप डाउनलोड करता येते व त्याच साईटवर दिलेली ऍक्टिव्हेशन की वापरून ते सॉफ्टवेअर पूर्णत्वाने वापरता येते. त्यांचे अभिनंदन. अर्थात इंटरनेटवर ते अजूनही जाऊ शकत नाही, तसेच इतर भाषांना ही सुविधा देणे बाकी आहे. त्यासाठी अजून चर्चा करावी लागणार.
-------------------------------------------------

Wednesday, February 4, 2009

Geeta Recitals -- Dr. Balram Agnihotri

Geeta Recital by Dr. Balram Agnihotri

श्रीमद्भगवद्गीता तथा दुर्गा सप्तशती हमारे पाठ ग्रंथ हैं अर्थात् घर घर में इनके पाठ का चलन है जो हमारी संस्कृति का अभिन्न अंग है। गीता के सारे अध्याय आप यहाँ देख व सुन सकते हैं। पाठ किया है पूज्य पिताजी प्रो. डॉ बलराम सदाशिव अग्निहोत्री ने। तब वह 86 वर्ष की आयु के थे। उन्हे पूरी गीता करीब करीब कंठस्थ थी और हम बच्चों को भी वही संस्कार दिया। उनकी बाबत जानकारी के लिये देख सकते हैं उनका ब्लॉग.
http://www.kaushalamtrust.com/

Geeta Recitals by Dr. Balram S. Agnihotri -- गीता पाठ
Intro --
SrimadBhagavGeeta and Durga Saptashati are called PATH GRANTH which means that they are to be recited as a daily rite. Thousands of Indian households have this tradition.
My father Dr. Balram Sadashiv Agnihotri, Prof of Sanskrit and Philosophy guided research students for M. Phil and Ph. D. at Mithila Research Institute, Darbhanga, Bihar. He was a great student of Geeta and made it an every-evening habit for us children to sit with him for Geeta recital. That is how we all learnt Geeta by heart. Much later, when he was 86, I was able to get complete recording of Bhagvadgeeta done by him. Even at that age he was able to record all the 18 chapters in 1 sitting.
Around same time he managed to finish writing his book BuddhiYog, which he was planning for years. It is said in Geeta – “ ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते -- I give good wisdom to people with which they can reach me” To whom does God give the Wisdom and how do we go about getting His Blessings? My father has tried to explain it in his book BuddhiYog.
I have been able to put his Geeta recitals on YouTube. Here are the links.
Adhyay 18 – Moksha Sanyas Yog
Adhyay 17 - ShraddhaTraya Vibhag Yog
Adhyay 16 – Daivasur Sampad Vibhag Yog
Adhyay 15 – Purushottam Yog
Adhyay 14 – GunaTraya Vibhag Yog
Adhyay 13 – Kshetra Kshetrajnya Vibhag Yog
Adhyay 12 – Bhakti Yog
Adhyay 11, part 1 - Vishvaroop Darshan Yog
part 2
Adhyay 10 – Vibhutu Yog
Adhyay 09 – RajVidya RajGuhya Yog
Adhyay 08 – Akshar Brahma Yog
Adhyay 07 -- Jyan Vijyan Yog
Adhyay 06 – Atma Sanyam Yog
Adhyay 05 – Karma Sanyas Yog
Adhyay 04 – JyanKarma Sanyas Yog
Adhyay 03 – Karma Yog
Adhyay 02 – Sankhya Yog
Adhyay 01 - Arjun Vishad Yog
--------------------------------------------------------------------------------