शुक्रवार, 20 मार्च 2009

शासनदरबारी संगणकावरील व्यवहार व पाठपुरावा

मराठी अभ्यास केंद्राचा नेक इरादा
नमस्कार,
शासनदरबारी पुढील मागण्या करायचे मराठी अभ्यास केंद्गाने ठरवले आहे. आपल्या काही
सूचना असतील तर जरुर कळवा.
राममोहन
*संगणकावरील शासकीय व्यवहाराचे प्रमाणीकरण - शासनाकडून अपेक्षा***
१. मराठीच्या संगणकावरील वापरासाठी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान
खात्यामार्फत प्रसारीत केलेल्या सूचनांचा राज्य शासनाने पाठपुरावा करावा. यात
संगणकावर राज्यभाषांमध्ये सर्व शासकीय व्यवहार करण्यासाठी *युनिकोड* पद्धतीचा
वापर अनिवार्य केला असून त्यासंदर्भात निश्चित धोरण आखले गेले आहे.
२. केंद्र शासनाने मान्य केलेल्या युनिकोडच्या तत्वांनुसार महाराष्ट्राचे
माहिती-तंत्रज्ञान विकास धोरण आखून *युनिकोड-अनिवार्य संगणकीय व्यवहार* हे तत्व
सर्व शासकीय पातळ्यांवर लागू करावे.
३. मराठीच्या संगणकावरील प्रमाणीकरणासाठी युनिकोड पद्धत हाच सर्वमान्य आणि
विनामूल्य उपाय असल्यामुळे त्याच्या प्रसार-मोहिमेवर राज्यशासनाने भर द्यावा.
विशिष्ट कालावधीत शासकीय कार्यालयांमध्ये युनिकोडची साद्यंत माहिती उपलब्ध करुन
देण्यात यावी.
४. या विषयावर राज्यशासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने परिपत्रके
काढूनदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाहीत. ही त्रुटी भरुन काढण्यासाठी
शासनाने युनिकोडच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या व्यावहारिक
उपाययोजनांवर भर द्यावा.
५. मराठीतून इंटरनेट-तंत्रज्ञान प्रभावी आणि सुलभपणे वापरण्यासाठी
युनिकोडला हाच एकमेव तांत्रिक पर्याय आहे. युनिकोड व्यतिरिक्त इतर कोणतीही
पद्धत वापरल्यामुळे संकेतस्थळ, ई-मेल, ई-व्यवहार करताना अनेक तांत्रिक अडचणी
उद्भवतात. उदा. महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ युनिकोडमध्ये नसल्यामुळे त्यावरील
माहिती वाचताना अथवा उतरवून घेताना तांत्रिक अडचणी येतात. त्यासाठी
राज्यशासनाशी संबंधित सर्व विभाग, आस्थापने आणि प्रशासन-संस्थांची संकेतस्थळे
युनिकोडमध्ये रुपांतरित करुन घ्यावीत.
६. युनिकोड हे संगणकाच्या ऑपरेट सिस्टीममध्ये असल्यामुळे विनामूल्य उपलब्ध
आहे. त्यासाठी भाषाविषयक कोणतेही सॉफ्टवेअर (उदा. आकृती, श्रीलिपी इ.) खरेदी
करण्याची आवश्यकता नाही. युनिकोडचा वापर अनिवार्य करतानाच शासनाने मराठीसाठी
असलेली सर्व सॉफ्टवेअर कालांतराने निकालात काढावीत आणि नवीन सॉफ्टवेअरच्या
खरेदीवर बंधने आणून अनावश्यक खर्च टाळावा.
७. सध्या आणि याआधी शासकीय व्यवहारात युनिकोडचा वापर नगण्य असल्यामुळे
कोणताही शासकीय व्यवहार सार्वत्रिक करता येत नाही, तसेच इंटरनेटवरदेखील उपलब्ध
करुन देता येत नाही. त्यासाठी उपलब्ध युनिकोड-कनव्हर्टरचा वापर करुन सर्व
व्यवहार युनिकोडमध्ये उपलब्ध करण्याची सोय करावी.
८. युनिकोड वापर अनिवार्य करतानाच त्याचे किमान प्रशिक्षण सर्व कर्मचारी
वर्गाला देण्यासाठी युनिकोड वापराची माहिती-पुस्तिका, ई-मॉड्युल (सी.डी.
स्वरुपात) इ. साधने वापरुन युनिकोड-प्रशिक्षण व्यवस्था उभारावी. यासाठी
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ आणि याविषयात काम करीत असलेल्या संस्थांना एकत्रित
करुन त्यांच्यावर कालबद्ध आणि नियोजनबद्ध प्रशिक्षणाची व्यवस्था सोपवावी.
अनावश्यक सॉफ्टवेअर-खरेदीतून वाचणारा निधी या प्रशिक्षणासाठी वापरण्याची तरतूद
करावी.
९. भविष्यातील सर्व प्रगत संगणकीय तंत्रज्ञान मराठीमधून आणण्यासाठी
युनिकोडचाच आधार असेल यावर सर्व संगणक-तज्ज्ञांची एकवाक्यता आहे. उदा.
कनव्हर्टर्स, स्कॅनर्स, संगणक-प्रोग्रॅम्स अशा अनेक सुविधा तसेच ई-शासनासारखा
महाकाय प्रकल्प मराठीतून तयार करण्यासाठी शासनाने तरुण संशोधकांना वाव द्यावा.
यासाठी ईच्छाशक्ती दाखवून प्रगत माहिती तंत्रज्ञानाची कास मराठीतून धरावी.
१०.मराठी शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक अभ्यासक्रम, संगणकाचे अनेक लहान-मोठे
अभ्यासक्रम यांत युनिकोडचे प्रकरण समाविष्ट करण्यासाठी शासनाच्या संबंधित
शिक्षण-विभागांनी पुढाकार घ्यावा.
--------------------------------
युनिकोड वापरा मराठीतून ई-मेल करा
MS WORD, EXCEL, POWERPOINT कशामधूनही मराठीतून काम करा...विनामूल्य
आजच आपल्या WINDOWS XP मधील युनिकोडचा पर्याय चालू करा
मराठीतून उपलब्ध अनेक सोयी-सुविधांसाठी पुढील लिंक पहा
http://ildc.gov.in/marathi/mdownload2000.htm

रविवार, 15 मार्च 2009

संगणक मराठीतून वापर १) बैठकीचे कार्यवृत दिनांक - 30 जानेवारी 2009

सा.प्र.वि./20ब
संगणक व इंटरनेट यांचा मराठीतून वापर करण्याबाबत भाषा व संगणक तज्ञ यांचेबरोबर दिनांक - 30 जानेवारी 2009 रोजी झालेल्या बैठकीचे कार्यवृत -- क्लिक करा.

-----------------------------------------------------------------------
From: Nitin Nimkar <nvncom@yahoo.com>
Date: 2009/10/29
Subject: Re: Fwd: This is too important an issue to be driven by ego's and remain un resolved.
To: Leena Mehendale <leena.mehendale@gmail.com>
Cc: jitendra <jituviju@gmail.com>, दीपक पवार <santhadeep@gmail.com>, राममोहन खानापूरकर <ram.research@gmail.com>, प्रकाश परब <p_s_parab@yahoo.co.in>, प्रकाश परब <pspddombivli@gmail.com>, संतोष क्षीरसागर <kshirsagar.santosh@gmail.com>, युनिकोड गट <unicode_emarathi@googlegroups.com>
मेहेंदळे मॅडम आणि मित्रांनो,
तुम्ही जेंव्हा तुमच्या संगणकावर गार्गी वापरता तेंव्हा तो फक्त तुमच्याच संगणकावर असल्याची खात्री आहे. दुसर्‍याच्या संगणकावर तो असेलच याची खात्री काय? यासाठीचे गेले अनेक दिवस मी सांगतो आहे की 2/4 चांगले टंक मायक्रोसॉफ्ट आणि लीनक्स ऑपरेटींग सिस्टमवर ऑपरेटींग सिस्टम बरोबरच महाराष्ट्रातील सगळ्या संगणकावर असतील असे बंधन/दबाव मायक्रोसॉफ्टवर महाराष्ट्र शासन का टाकत नाही? यासाठी मराठीचा वसा घेतलेल्या महाराष्ट्र शासनाने काय विचार केला ? कोणती पावले उचलली? हाच तर प्रश्न आम्हा मराठी प्रेमींना पडतो आहे, सतावतो आहे.  2/4 उत्तम टंक जर ओएस बरोबरच आले तर हे सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील. पण नाही, ते भाग्य मराठीच्या नशीबी नाही. 

दुसर्‍या बाजूला 700 मराठी टंक केल्याचा दावा सी डॅक करते आणि ते टी डी आय एल वरती उपलब्ध आहेत आहेत असे म्हणते. पण ओ एस तयार करणार्‍याला आम्ही ते देणार नाही असे अडून बसते. विचार करा की जर ते 700 टंक मराठीप्रेमींपर्यंत पहोचलेच नाहीत तर त्याचा काय उपयोग ? आम्हाला 700 टंक नकोत 2/4 उत्तम स्टॅंडर्ड टंक ओ एस बरोबर आले की आपले काम होईल. इंग्रजीचेही तसेच आहे. टाईम्स न्यू रोमन, एरियल, टाहोमा आणि सॅन सेरिफ हे टंक ऑ एस बरोबर येतात. या व्यतिरिक्त जर इंग्रजीमधे जर कुणाला मजकूरात कला कुसर करायची असेल तर त्यालाही खास टंक सी डॅक किंवा तत्सम  टंक बनवणार्‍याकडून विकतच घ्यावे लागतात आणि त्यावर सी डॅक जसे अत्ता अडून बसले आहे तसे ते अडून बसतात. त्या खास टंकांचे परवाने तुम्हाला टंक सहज वापरू देत नाही. त्यांचे परवाने तुमच्या खास कामासाठी वेगळी फी आकारु शकतात. 

या वर उपाय खाली :

1) मायक्रोसॉफ़्टने युनिकोड मानांकनाचा जसा मंगल टंक केला आहे तसेच आणखी 2/4 तयार करणे व ओ एस बरोबर देणे. यासाठी महाराष्ट्र शासन त्यांच्यावर दबाव टाकू शकते.

2) सी डॅककडून टंक विकत घेऊन ते सर्व ओ एस साठी खुले करणे. 

3) शहासर आणि संतोष क्षीरसागर यांच्यासारख्या टंक तंत्रज्ञानात पारंगत व्यक्तींनी टंक निर्मीतीचा प्रकल्प करुन तयार करुन 4 टंक तयार करुन मायक्रोसॉफ्ट सकट सगळ्या ओएस साठी देणे आणि ते महाराष्ट्र शासनाने सर्व ओ एस वरती असलेच पाहिजेत असे बंधनकारक करणे. 

4) गरज असेल तर याहू, जी मेल यांच्यासारख्या कंपन्यानां मराठी टंकाची सोय करण्याचे बंधन महाराष्ट्र शासन टाकू शकते. जर टंक उपलब्ध असतील तर ते ती सोय ते चुटकीशरशी करु शकतात. 
मला वाटते मी सर्व संकल्पना स्पष्ट केली आहे. अजूनही काही शंका असल्यास यावर प्रकाश टाकू शकतात.  माझ्या संकल्पनांमधे काही उणीव असल्यास शहासर, तुम्ही त्यात सुधारणा करावी ही विनंती. 

आपला,
नितीन निमकर
  



From: Leena Mehendale <leena.mehendale@gmail.com>
To: Nitin Nimkar <nvncom@yahoo.com>
Cc: jitendra <jituviju@gmail.com>; दीपक पवार <santhadeep@gmail.com>; राममोहन खानापूरकर <ram.research@gmail.com>; प्रकाश परब <p_s_parab@yahoo.co.in>; प्रकाश परब <pspddombivli@gmail.com>; संतोष क्षीरसागर <kshirsagar.santosh@gmail.com>; युनिकोड गट <unicode_emarathi@googlegroups.com>
Sent: Wed, October 28, 2009 5:52:13 PM

Subject: Re: Fwd: This is too important an issue to be driven by ego's and remain un resolved.


i have gargi font and I can use it on my word file but not while typing e-mail to you. hence question mark. Does it mean we still have to go some more miles?
How to proceed ?
-lm

2009/10/28 Nitin Nimkar <nvncom@yahoo.com>
मित्रांनो,
मी सी डॅकचे काही चांगले टंक आणि गार्गी, एरिअल वापरुन खालील पान तयार केले आहे. सगळे टंक माझ्याकडे आहेत आणि मी ते नेहमी वापरतो. त्यामुळे मराठीतील टंक विवीधता वापरता येते. फक्त जर हे टंक नसतील तर तुम्हाला मजकूर मंगल मधेच दिसेल.
जर वरील मजकूर तुम्हाला मंगलमधेच सुरवतीच्या ओळींसारखा दिसला तर त्याचा अर्थ पुढे इंग्रजीत नाव लिहिलेले टंक तुमच्याकडे नाहीत. 
आपला,
नितीन निमकर



From: Leena Mehendale <leena.mehendale@gmail.com>

To: Nitin Nimkar <nvncom@yahoo.com>
Cc: jitendra <jituviju@gmail.com>; दीपक पवार <santhadeep@gmail.com>; राममोहन खानापूरकर <ram.research@gmail.com>; प्रकाश परब <p_s_parab@yahoo.co.in>; प्रकाश परब <pspddombivli@gmail.com>; संतोष क्षीरसागर <kshirsagar.santosh@gmail.com>; युनिकोड गट <unicode_emarathi@googlegroups.com>
Sent: Wed, October 28, 2009 3:19:29 PM
Subject: Re: Fwd: This is too important an issue to be driven by ego's and remain un resolved.


has anyone tried gargi or Ariel unicode or calibree on blog? Do they work?
-LM

2009/10/19 Nitin Nimkar <nvncom@yahoo.com>
शहा सर,

माझ्या मते आपण सी डॅकचे फॉंटस आपल्या सगळ्या कामाला बिनदिक्कत वापरावेत. मला वाटत नाही की ते आपल्याकडे पैसे मागायला येतील. आणि आलेच तर त्यावेळी आपण त्यांना नडू शकतो. तुमचे फॉंटस घेऊन जा. आम्हाला नकोत. काही झाले तरी युनिकोडमधून आपला मजकूर आपल्याकडे आहेच. तो फॉंटमुळे आपल्याकडून जात नाही.  आपल्याकडे उपलब्ध असलेला मंगल फॉंट आपण वापरतो आहोतच. शिवाय कॅलिब्री, ऍरियल युनिकोड हे दुसरे पर्याय आता उपलबद्ध आहेतच. त्यांचे भांडण मायक्रोसॉफ्टशी आहे. अर्थात त्याने मराठी प्रसाराला मोठी खीळ बसते. पण आपण आहे ति थून पुढे तर सरकायलाच हवे. 

सी डॅक चे फॉंटस वापरायचे नसतील तर फक्त एकच उपाय उरतो तो म्हणजे 2/4 फॉंटस आपण तयार करुन तुम्ही म्हणता त्या तर्‍हेने मुक्त ठेवावे. पण या साठी पैसे कोण उभे करणार आणि हे केंव्हा कोण करणार? नेमके प्रकल्प प्रारुप कोणी तयार केले तर निदान शासनाला (मॅडमना) सांगता येईल की पैसे उभे करा. नाहीतर शेवटच्या मिटींगमधे मी सांगितल्याप्रमाणे सी डॅककडून शासनाने फॉंट विकत घेऊन मुक्त करावेत. ते लवकर होवू शकते. दुसरा उपाय म्हणजे जे लोक सी डॅकला अर्थ सहाय्य करतात त्यांनी पैसे देतांना सी डॅकवर फॉंट मुक्त करण्याचे बंधन टाकायला हवे. ते करता येऊ शकते. 

या बाबतीत तुम्ही आणि श्री. संतोश क्षीरेसागर नेमका विचार मांडू शकता. 

नाहीतर आपण या बाबतीत पुढे कसे सरकणार? आपण गेले 10 महिने ही चर्चा करतो आहोत. उपाय काय ? 

आपला,
नितीन निमकर