किती व्याकरण शिकाल ?
(३९)
भाषा शिकवनांना व्याकरण किती शिकवावे या बाबत दोन टोकाच्या भूमिका बरेचदा घेतल्या जातात.. त्याच्या शिवायही भाषा बोलता येते - सहित्याचा रसास्वाद घेता येतोय मग कशाला हवेत ते नाम सर्वनामाचे धडे, किंवा उपसर्ग प्रत्ययाचा त्रास - झाल्या थोड्या शुद्धलेखनाच्या चुका म्हणून कांय बिघडले !
दुसऱ्या बाजूचे लोक सध्या अल्पमतात आहेत ! त्यांच्या मते विद्यार्थ्याला व्याकरण आलेच पाहिचे. व्याकरणाशिवाय भाषा शिकणे म्हणजे दृष्टिवाचून रंगांचे वर्णन वाचण्या सारखे ! अशा तहेने (व्याकरण न शिकता) तुम्ही भाषा शिकूच शकत नाही !
पण मी मात्र या प्रश्नाकडे तिसऱ्याच बाजूने पहाते ! आपले व्याकरण शिकल्याने आपल्याला परभाषा चटकन शिकता येते ही ती बाजू ।
विशेषतः आपल्याला इतर भारतीय भाषा शिकायच्या असल्या तर व्याकरणाचा मोठा फायदा असा कि या सर्वांचे व्याकरण बरेचसे सारखे आहे । या वेगवेगळया भांषाची तुलना संस्कृत व इंग्रजी व्याकरणाबरोबर करून आपल्याला व्याकरणाचा अभ्यास खूप सोपा करता येतो. व्याकरणातील महत्वाच्या विषयांची एक यादीच मी करून ठेवली व तेवढे शिकून घेतले कि आपले नण्वद टक्के तरी काम भागते. इथे इंग्रजीबदल एकच लक्षांन ठेवायचे. इंग्रजीची वाक्य रचना जरी मराठी वाक्यरचने पेक्षा वेगळी असली तरी व्याकरणाचे नियम पुष्कळसे सारखे आहेत.
गाणं शिकतांना किंवा कविता पाठ करतांना तालाच किंवा ठेक्याच जे महत्व आहे तेच महत्व व्याकरणाला आहे कारण व्याकरणामुळे भाषा सूत्रबद्ध होते. भाषेचा एक आराखडा तयार होतो - भाषा विस्कळीत होत नाही. गाण्याची गोडी संपूर्ण पणे कांही तालावर अवलंबून नसते पण कांही गाणी त्यातील ठेक्यामुळेच गोड वाटतात. भाषेचेही तसेच आहे. आपल्याला पुढे मागे इतर भारतीय भाषा शिकण्यासाठी किती व्याकरण आल पाहिजे ? त्याची यादी अगदी छोटीशी आहे.
पहिला महत्वाचा धड़ा म्हणजे वाक्यातील 'कर्ता' कोण ? व्याकरणातील किती तरी प्रश्नाची उत्तर शोधतांना कर्ता कोण हे समजल्यावर उत्तर पटकन शोधता येतं.
त्या खालोखाल महत्व आहे ते शब्दांच्या प्रकाराला - अगदी संस्कृत पासून मराठी पर्यत व इंग्रजीत सुद्धा शब्दांचे आठ प्रकार पाडलेले आहेत -- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण, केवलप्रयोगी अव्यय, उभयान्वभी अव्यय व उद्गारवाचक किंवा विस्मयादिबोधक शब्द ।
यापैकी नाम कशाला म्हणतात, त्याचे पाच पाडलेले आहेत व कर्ता हा बहुधा नाम व कांही वेळा सर्वनाम या प्रकारांतच मोडतो, तसेच क्रियापद म्हणजे झालेले काम दाखवणारा शब्द इथपर्यंत आपल्याला अगदी सुरुवातीलाच शिकवलेले असते. यापैकी क्रियापदाची रुप सारखी बदलत असतात व परभाषा शिकू पहाणा-यांना त्याचाच जास्त त्रास होतो. कर्ता जसा असेल व काळ जसा बदलेल त्या प्रमाणे क्रियापदाचे स्वरुप बदलते. म्हणून कर्त्याबाबत तीन गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात - वचन, लिंग व पुरुष तसेच काळ कोणता आहे ते ही पहावे लागते – वर्तमान, भूत किंवा भविष्य.
'मुलगी जाते' व 'मुली जातात' या दोन वाक्यातून आपल्याला लक्षात येईल कि एकवचनी शब्द मुलगी आणि बहुवचनी शब्द मुली या दोघांसाठी जाणे या क्रियापदाची दोन रुपे वापरावी लागली ! हा नियम बहुतेक सर्व भाषांमधे आहे. संस्कृत मधे तर द्विवचनासाठी सुद्धा क्रियापदाचे वेगळे रूप वापरावे लागते.
लिंगाप्रमाणे क्रियापदाचे रुप बदलावे लागते ते मराठीत - मुलगी जाते अस आपण म्हणतो. मूळ संस्कृत भाषेत हा फरक नाही. तरीही मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती भाषांमधून क्रियापदाचे रुप लिंगाप्रमाणे बदलते. बंगालीत मात्र बदलत नाही इंग्रजीतही बदलत नाही. मात्र हिंदीत दोनच लिंग वापरतात.
मी (किंवा आम्ही), तू (किंवा तुम्ही) आणि
इतर सर्व असे तीन प्रकारचे कर्ते असू शकतात. यांना प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष व तृतीय पुरूष म्हणतात. यांच्यामुळे देखील क्रियापदाचे रूप बदलते. यासाठीच संस्कृत मधे धातुरुपे पाठ करावी लागतात - तीन प्रकारची वचने व प्रत्येकी तीन पुरूष अशी नऊ धातुरूपे प्रत्येक क्रियापदासाठी पाठ करुन ठेवली कि झाले. इंग्रजीत सुद्धा वचनाप्रमाणे रूप बदलते पण थोड्याच क्रियापदांचे. To Be हे सर्वांत महत्वाचे क्रियापद सोडले तर इतर क्रियापंदाचे रुप फार बदलत नाही.
कर्त्याशी संबंधित या तीन कारणांशिवाय आणखीन तीन कारणांनी क्रियापदाचे रुप बदलावे लागते. पैकी पहिले कारण काळ घडणारी क्रिया वर्तमानकाळात झाली कि भूतकाळात कि भविष्यकाळात होणार? आणि त्या त्या काळांत पुनः लिंग, वचन व पुरुष माप्रमाणे भेद आहेतच. पण एकदा यांची युक्ति कळली कि प्रत्येक क्रियापदाचे रुप वेगळे पाठ करत बसावे लागत नाही.
दुसरे कारण म्हणजे वाक्य आज्ञार्थ असेल किंवा भावे प्रयोगी असेल किंवा अपूर्ण रुप दाखवात असेल तर क्रियापदाचे रुप बदलते. या शिवाय जर कर्मणी प्रयोग असेल तरी क्रिया पदाचे रुप बदलते. हे सर्व बदल संस्कृत, इंग्रजी मराठी, हिन्दी - या सर्व भाषांमधे आहेत. गंमत अशी कि एका भाषेत क्रियापदाचे रूप कोणत्या प्रकारे ठरले आहे हे कळले कि इतर भाषेमधे सुद्धा त्याचप्रमाणे ठरणार हे उघड आहे. शिवाय ज्यांना शाळेतच तीन-चार भाषा शिकाव्या लागतात त्यांना हाच नियम सर्व पेपरांना पुरतो व व्याकरणात हमखास पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात.
यानंतर माइया यादीत महत्व आहे ते केवलप्रयोगी अव्ययाला (म्हणजे इंग्रजीतले preposition) काम करणाऱ्याने नेमके काय व कुठले काम केले ? थोडक्यांत वाक्यातील नामाचा आणि क्रियापदाचा, किंवा एका नामाचा आणि दुसऱ्या नामाचा संबंध आपल्याला या शब्दांमुळे कळतो. राम, घर, आणि गेला हे तीनच शब्द. पण राम घराकडे गेला आणि राम घरातून गेला या दोन वाक्यांचा अर्थ फार वेगळा आहे. बकरीने खाल्ले कि बकरीला खाल्ले ? हा उलगडा बकरी बरोबर लागलेल्या अव्ययामुळेच होतो. इंग्रजीत एकूण पंचवीस तीस preposition आहेत. ती मालगाडीच्या डव्यांसारखी एकापाठोपाठ एक लिहून काढून पाठच करुन टाकायची pre चा अर्थ आधी व position चा अर्थ जागा. तर ज्याची जागा नामाच्या आधी येते ते preposition. मात्र हे झालं इंग्रजीत. संस्कृत आणि त्यातून निघालेल्या सर्व भाषांमधे हे केवलप्रयोगी अव्यय शब्दाच्या म्हणजे नामाच्या पुढे लागतात व दोन्ही मिळून एकच शब्द तयार होतो उदा. रामाला या नामापुढे लागणाऱ्या शब्दानाच
विभक्तिचे प्रत्यय म्हणतात. संस्कृतात अशा आठ विभक्ति असतात त्यामुळे नामाचे एकवचनी द्विवचनी व बहुवचनी रूप व प्रत्येकाच्या आठ विभक्ति या प्रकारे संस्कृत मधे प्रत्येक शब्दाची २४ रुपे तयार होतात व तेवढीच पाठ करावी लागतात. त्या त्या विभक्तिमधला शब्द कुठे वापरायचा याचे इतके सोपे नियम आहेत कि संस्कृत पण सोपी होऊन जाते. शिवाय नामाची जी विभक्ति असेल, किंवा लिंग असेल तीच विभक्ति व तेच लिंग विशेषणासाठी पण लावावे लागते.
उदा. मी गहन वनात गेलो या मराठीत गहन या विशेषणाचं रुप वनात या शब्दाची सप्तमी विभक्ति असून देखील बदलले नाही. संस्कृत मधे मात्र ते बदलून गहने वने असं होते.
यानंतर येतात सर्वनामाचे प्रकार व विशेषणाचे. सर्वनामाचे प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम, निजवाचक, प्रश्नवाचक संबंधवाचक, तसेच विशेषणाचे प्रकार पण गुणवाचक, संख्यावाचक, प्रश्नवाचक, possessive, व demonstrative असे आहेत. या मधे आपण पहातो कि प्रश्नवाचक, possessive, व demonstrative शब्द विशेषणात्मक आणि सर्वनामात्मक अशा दोन्ही प्रकारे असू शकतात. उदा. What is your question? मधे what हे प्रश्नवाचक सर्वनाम आहे व या वाक्यातील कर्ता what हा शब्दच आहे. पण तेच वाक्य what question did you ask अस केलं तर what हे प्रश्नवाचक विशेषण बनतं. त्याला विशेषण म्हणून ओळखायची सोपी खूण अशी कि त्याच्या पुढे question हे नाम आहे हीच उदाहरणे possessive, व demonstrative adjective ला लागू पडतात. This is Jaya’s book या मधे this हे दर्शक सर्वनाम आहे व Jaya’s हा शब्द possessive adjective आहे. तेच वाक्य आपण This book is Jaya’s. अस म्हटल तर this हे adjective ठरत. That road is broad आणि That is a broad road. या दोन वाक्यांमधे that हा शब्द एकदा demonstrative adjective व एकदा demonstrative pronoun म्हणून आलेला आहे.
शनिवार, 20 जुलाई 2013
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें