Tuesday, May 16, 2017

२०१७ -- फर्गसन कॉलेज व परमहंसनगर

कौशलम् चे लेटरहेड
दि. ०३-०५-२०१७  
 प्रति,
माननीय डॉ. श्रध्दा प्रभुणे-पाठक
(नगरसेविका,प्रभाग क्र-१०)
                   विषय- शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी टायपिंग शिकविण्याबाबत.

महोदया,
    २०१७ च्या निवडणुकीमध्ये आपण नगरसेवक पदी निवडून आल्याबद्दल प्रथमतः आपले मनपूर्वक आभिनंदन.
          कौशलम् न्यासच्या प्रमुख संरक्षिका, श्रीमती लीना मेहेंदळे यांच्या चर्चेच्या अनुषंगाने हे पत्र कौशलम् न्यासाच्या वतीने पाठवीत आहे. कौशलम् न्यासाच्या उद्दिष्टांमध्ये संस्कृत व प्रादेशिक भाषांचे संवर्धन हे प्रमुख उद्दिष्ट आहे व त्यासाठी संगणकावर भारतीय भाषांना सरसकट एकसारखेपणाने लागू होणारा इन्स्क्रिप्ट किबोर्ड प्रचारात आणण्यासाठी कार्यक्रम घेतले जातात. या उपक्रमाची गरज विद्यालयांमध्ये देखील आहे कारण या कौशल्यशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील जीवनामध्ये निश्चितपणे  होऊ शकतो.
    कौशलम् ट्रस्ट व आपल्या सहयोगाने असे उपक्रम घेतले जाऊ शकतात. आपल्या विभागातील महानगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये प्रथम हा उपक्रम घेतला जावा, असा आमचा प्रस्ताव आहेहा उपक्रम १२ दिवसांचा (२ आठवडे) असेल सोमवार ते शनिवार या दिवसांत दररोज १ तासाचा कालावधीचा असेल. हा उपक्रम गरजेचा आहे हे आपणास संलग्न टिप्पणी वरून पटेल. सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही आपणांस भेटू इच्छितो.
कळावे ही विनंती,
धन्यवाद,
 कौशलम् ट्रस्ट.
१) प्राची लुष्टे
२) अमित मोकर
(फोन.नं. ०२०-२५३८३४७२) 

टिपणी संलग्न.
टिपणी:

विद्यालयामध्ये सुलभ मराठी टंकलेखनाबाबत जाणीव व जागृती निर्माण करणेः-

            मराठी विद्यालयामध्ये पुष्कळसा लेखी व्यवहार हा मराठीतूनच होतो. त्यामूळे संगणक हा विद्यालयीन कामासाठी वापरायचा झाला तर शक्य असेल त्या सर्वांना  संगणकावर मराठी लिहीता यायला हवे. खासकरून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगणकावर मराठी टायपिंग शिकण्याची उपयुक्तता फार आहेसंगणकात यासाठी काय सोय आहे ते समजून त्यांना हे शिकता येऊ शकेल
            इंग्रजी कि-बोर्ड हा टाईपरायटर व संगणकामध्ये एकसारखाच असतो. जरी तो लक्षात ठेवायला थोडा अवघड असला तरी संगणकावर तोच असल्यामूळे तो की-बोर्ड लक्षात ठेवण्यावाचून पर्याय नसतो. परंतू मराठी टंकलेखनाची माहिती मराठी शाळेतील शिक्षकांना फारशी असत नाही.
            संगणकावरील मराठी टंकन करण्यासाठी इन्स्क्रिप्ट मराठी टंकलेखन हा सरळ व सोप्या पद्धतीचा पर्याय आहेते शिक्षण शालेय मुलांना द्यावे. आम्ही प्रस्तवित केलेल्या उपक्रमाचा उद्देश सरळ व सोप्या पद्धतीचे इन्स्क्रिप्ट मराठी टंकलेखन हे आपल्या विद्यार्थ्याना कसे अवगत करता येईल असा आहे.
सोपा का ?
            यामध्ये मराठी वर्णमालेनुसार की-बोर्डची मांडणी केली आहे. त्यामुळे की-बोर्डवरील मराठी अक्षरांचे क्रम लक्षात ठेवण्यची कटकट संपते व अतिशय सोप्या पद्धतीने लोकांना इंग्रजी की-बोर्ड माहीती नसताना ही मराठी टंकनलेखन अवगत करता येते.
            या टंकलेखनाचे वैशिष्ठ्य म्हणजे डाव्या बाजूला स्वर, काना, मात्रा तर उजव्या बाजूला सर्व व्यंजने आहेत. त्यामूळे एका-आड एक दोन्ही हाताच्या चार-चार अशा आठही बोटांनी टंकनलेखन केले जाऊन, टंकलेखनाचा वेग वाढवण्यास देखील मदत होते.
उपक्रमाचे स्वरूपः-
·                    हा उपक्रम १२ दिवसांचा (२ आठवडे) असेल.
·                    सोमवार ते शनिवार या दिवसांत दररोज १ तासाचा कालावधीचा असेल.
·                    शाळेमध्ये किमान ५ संगणक असणे गरजेचे आहे,
·                    ३ विद्यार्थ्यांसाठी एक संगणक असेल,
·                    अशा प्रकारे एका बँच मध्ये किमान १५ विद्यार्थी असतील.
·                     संगणक संख्या कमी असल्यास दोन बँच घेतल्या जावू शकतात.
·                    कोशलम् न्यासाच्या वतीने दोन प्रशिक्षक काम करतील.

 अशा प्रकारे उपक्रमाचे स्वरूप असेल
-------------------------------------------
कौशलम् चे लेटरहेड
या पत्राची प्रत जयंत सहस्रबुद्धे (विज्ञान भारती) यांना ईमेल केली
 दिनांक-०५-०५-२०१७
प्रति,
मा. मुकुंद देशपांडे
संयोजक- भारतीय विज्ञान संमेलन, Expo,
 पुणे-४११००४
            विषयः- मराठी टायपिंग शिकविण्याच्या सोप्या पद्धतीचे प्रात्यक्षिक यासाठी स्टॉल मिळण्याबाबत.
महोदय,
    कौशलम् न्यासच्या प्रमुख संरक्षिका, श्रीमती लीना मेहेंदळे व प्रा. विनय चाटी यांच्यात चर्चा झाली असता. या चर्चेच्या आधारे आम्ही आपल्या बरोबर ०४-०५-२०१७ रोजी भेट घेतली.
   भेटीच्या अनुषंगाने हे पत्र कौशलम् न्यासाच्या वतीने पाठवीत आहे. कौशलम् न्यासाच्या उद्दिष्टांमध्ये संस्कृत व प्रादेशिक भाषांचे संवर्धन हे प्रमुख उद्दिष्ट आहे व त्यासाठी संगणकावर भारतीय भाषांना सरसकट एकसारखेपणाने लागू होणारा इन्स्क्रिप्ट किबोर्ड प्रचारात आणण्यासाठी कार्यक्रम घेतले जातात. या उपक्रमाची गरज महाविद्यालयांमध्ये देखील आहे कारण या कौशल्यशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील जीवनामध्ये निश्चितपणे होऊ शकतो. तसेच Expo ला भेट देणारे सामान्य लोक, ही पद्धत ५ ते ६ मिनिटात सुद्धा शिकू शकतात. त्यामुळे याला महत्वप्राप्त झाले आहे.
     मराठी टायपिंग शिकविण्याची इनस्क्रिप्ट ही एक सोपी पद्धत असल्याने ही पद्धत सर्वांना अवगत होण्यासाठी कौशलम् ट्रस्ट कार्यरत असते. कौशलम् ट्रस्ट च्या द्वांरे अशा प्रकारचे अनेक उपक्रम हाती घेतले जातात. आपल्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही मराठी टायपिंग प्रात्यक्षिकासाठी स्टॉल लावू इश्चितो. स्टॉल लावण्या संदर्भात काही अटी व नियम असतील ते आपण आम्हाला कळवावे.
कळावे हि विनंती,
धन्यवाद,

कौशलम् ट्रस्ट.
) प्राची लुष्टे
) अमित मोकर
(फोन.नं.०२०-२५३८३४७२)
sp;    संगणक संख्या कमी असल्यास दोन बँच घेतल्या जावू शकतात.

·                    कोशलम् न्यासाच्या वतीने दोन प्रशिक्षक काम करतील.
  अशा प्रकारे उपक्रमाचे स्वरूप असेल
------------------------------------------------------------------
No comments: