Saturday, January 1, 2011

माधव शिरवळकर, संजय जोरी, अतुल कहाते व मी

Madhav Shirvalkar
to sanjay jori
cc Leena Mehendale
date Tue, Dec 28, 2010 at 5:51 AM
subject Re: Regarding your article in Lokmat - Manthan
तुम्ही मा. अतुल कहाते यांना पाठवलेल्या मेलची प्रत मला पाठवल्याबद्दल आभारी आहे.
२६ डिसेंबर २०१० चा दै. लोकमत (मंथन पुरवणी) मी वाचलेली नाही. त्यामुळे कहाते यांचा कीबोर्डसंबंधीचा लेख आणि गांगल यांचे इनस्क्रीप्ट कीबोर्ड सर्व दृष्टीने अयोग्य (का) ठरतो यासंबंधीचा लेख अद्यापि वाचलेला नाही. मात्र आता तो मिळवून वाचण्याचा प्रयत्न करीन.
इनस्क्रीप्ट कीबोर्ड अतिशय लोकप्रिय आहे ही सत्य परिस्थिती आहे. महाराष्ट्र राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेंहेंदळे ह्या तर इनस्क्रीप्ट कीबोर्डचा नुसता आग्रहच धरत नाहीत तर लोकांनी तो जास्तीत जास्त वापरावा यासाठी जागृती करण्याचे कार्य, आपल्या व्यस्ततेतून आवर्जुन वेळ काढून, करीत असतात. त्यांच्या संगणकाची जादूई दुनिया ह्या पुस्तकात त्यांनी ह्या संबंधी विस्ताराने लिहीलेही आहे. हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले आहे.
मला प्रश्न पडतो की आपल्या बोटांना एकदा एखादा कीबोर्ड सवयीचा झाला की तो कशासाठी बदलावा? तुम्ही टाईपरायटर (मतजल) कीबोर्ड वापरत होतात, त्याने तुमचे काम होत असे. असे असताना दुसऱ्या कीबोर्डकडे कशासाठी वळायचं? कीबोर्डचे महत्त्व हे केवळ टायपिंगपुरतेच आहे. त्या पलिकडे नाही. इनस्क्रीप्ट कीबोर्ड शिकायला सोपा आहे हे खरे आहे. पण जी मंडळी टाईपरायटर कीबोर्ड वर्षोनुवर्षे वापरत आहेत, त्यात त्यांचा वेग चांगला आहे, अशांनी इनस्क्रीप्टकडे वळलच पाहिजे असं नाही. टायपिंग बिनचूक व झपाट्याने होणं व टायपिंग करणाराला त्यात सहजता वाटणं हे तीन मुद्दे महत्त्वाचे. असो.
सध्या इनस्क्रीप्ट, टाईपरायटर आणि फोनेटिक हे तीन कीबोर्ड भारत सरकारतर्फे मोफत दिले जातात. ज्याला जो योग्य वाटतो त्याने तो वापरावा. एकत्र येऊन यापेक्षा आणखी वेगळा कीबोर्ड तयार करण्याची गरज आहे असं मला व्यक्तिशः अजिबातच वाटत नाही.
धन्यवाद.
- माधव शिरवळकर
----------------------------------------------------------------------------------------------------
2010/12/27 sanjay jori
प्रिय श्री. अतुल कहाते,
आपला दि.26/12/2010 रोजीचे दै.लोकमत - मंथन पुरवणीतील लेख वाचला. आपण मराठी टायपींगमध्ये ज्याव्दारे प्राविण्य मिळविले ते सॉफ्टवेअर व किबोर्ड लेआऊट जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.
मला मराठी टायपींग शिकण्याची तशी फारशी गरज नव्हती. परंतु कार्यालयीन वेळेनंतर जेव्हा टायपीस्ट नसतो, त्यावेळी काही तातडीचे टायपींग करावयाचे असल्यास अडचण व्हायची. त्याचबरोबर मला टाचपींगची आवडही असल्यामुळे
मी टाईपरायटर या‍ किबोर्डवर सराव करुन ब-यापैकी प्राविण्य मिळविले आहे. याअगोदर मी इंग्रजी टायपींगचे पाठानुसार सराव करुन त्यामध्येही चांगला वेग प्राप्त केलेला आहे.
मध्यंतरी श्री.माधव शिरवळकर यांचे युनिकोड या पुस्तकात इनस्क्रिप्ट या किबोर्डविषयी वाचनात आले. हा किबोर्ड सरकारने उपलब्ध केलेला असल्याने तो योग्य असेल अशी माझी धारणा आहे. त्यामुळे आता मी इनस्क्रिप्ट या किबोर्डवर टायपींगचा सराव सुरु केला आहे. तथापी वर उल्लेख केलेल्या दि.26/12/2010 रोजीचे दै.लोकमतचे त्याच मंथन पुरवणीत श्री. शुभानन गांगल यांचे लेखात इनस्क्रिप्ट हा किबोर्ड सर्व दृष्टीने अयोग्य ठरतो असे म्हटले आहे. त्यामुळे माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे.
ज्याप्रमाणे इंग्रजी किबोर्डबाबत मोठया प्रमाणात उहापोह होऊन आता सर्व जगात QWERTY हा किबोर्ड प्रचलित आहे, त्याचप्रमाणे आपण, श्री.माधव शिरवळकर व श्री. शुभानन गांगल अशा या क्षेत्रातील तज्ञांनी विचारविनीमय करुन मराठीसाठी एकच किबोर्ड लेआऊट सुचविल्यास आपण सर्व मायमराठीसाठी करीत असलेल्या सेवेत मोलाची भर पडेल.
तरी कृपया मला वरील बाबतीत मार्गदर्शन होणेस विनंती.
आपला,
संजय जोरी, शिर्डी
मो.9552500530.
--------------------------------------------------------------------------------------
sanjay jori to me
show details 1:12 PM दल 01.01.2011
श्रीमती मेहेंदळे मॅडम,
खालिल इ-मेल्सव्दारे मला आपल्या पुस्तकाबद्दल माहीती मिळाली. कृपया सदर पुस्तक मला कोठे उपलब्ध होईल याविषयी मार्गदर्शन व्हावे. आपण नाशिक येथे विभागिय आयुक्त असतांना, आपले शिर्डी येथिल बैठकीत मी साईबाबा संस्थानतर्फे उपस्थित होतो. आपण इनस्क्रिप्ट किबोर्डबाबत धरित असलेल्या आग्रहाबाबत मला स्वारस्य आहे.
धन्यवाद
संजय
जोरी, शिर्डी
मो
.9552500530.
------------------------------------------------------
मी संजय यांना --
आपल्या मेलबाबत धन्यवाद.
माझे पुस्तक संगणकाची जादुई दुनिया हे मुंबईत महाराष्ट्र शासनाच्या मरीन लाइन्स येथील बुक डेपो मधे मिळते. पुणे कलेक्टर ऑफिस मधील ब्रँचमधेही मिळते. इतरत्र ठाऊक नाही.
मात्र इनस्क्रीप्टबाबत आपण खालील लिंक पाहू शकता.

http://bhasha-hindi.blogspot.com/2009/02/blog-post.html
http://bhasha-hindi.blogspot.com/2009/02/blog-post.html
http://www.youtube.com/watch?gl=GB&hl=en-GB&v=0YspgTEi1xI&feature=related
http://gad.maharashtra.gov.in/marathi/dcmNew/news/bin/inscript-typing.pdf

श्री.अतुल कहाते, यांचा दि.26/12/2010 रोजीचे दै.लोकमत - मंथन पुरवणीतील लेख वाचलेला नाही. शुभानन गांगल लिहितात तो कीबोर्ड मला याग्य वाटत नाही कारण तोही बरहा किंवा गूगल ट्रांसलिटरेशन प्रमाणे रोमन लिपि आधारित आहे. म्हणजे तुम्हाला भारत लिहिण्यासाठी अगोदर
B-H-A-R-A-T = भारत
हे समजणे आवश्यक आहे. माझा त्यालाच विरोध आहे कारण त्यामुळे आपल्याकडील आठवीच्या पुढे न जाऊ शकणारी 50 टक्के मुलं संगणकापासून दूरच रहाणार. शिवाय भारतीय लिप्या मरणार आणि लिप्यांची एकात्मता ही भारतीय भाषांची खासियतही निरर्थक ठरणार.
शिरवळकराचे मत --
जी मंडळी टाईपरायटर कीबोर्ड वर्षोनुवर्षे वापरत आहेत, त्यात त्यांचा वेग चांगला आहे, अशांनी इनस्क्रीप्टकडे वळलच पाहिजे असं नाही. टायपिंग बिनचूक व झपाट्याने होणं व टायपिंग करणाराला त्यात सहजता वाटणं हे तीन मुद्दे महत्त्वाचे --
हे योग्य आहे. पण यांत तीन तोटे लक्षांत ठेवले पाहिजेत.
1) अशी मंडळी इतरांना झटपट मराठी टायपिंग शिकवू शकत नाहीत -- फक्त त्यांना चांगल्या टाइपिंग शाळेत जाण्याचा सल्ला देऊ शकतात. मी मात्र माझ्याकडे येणारी कामवाली बाई, ड्रायव्हर, वर्तमानपत्र टाकणारी मुलं अशांना माझ्या संगणकावर झटपट शिकवून त्यांच्याकडून थोडेफार कामही करून घेते.
2) टाईपरायटर कीबोर्ड वरील लेकन युनीकोड प्रमाणित नसल्याने कनव्हर्टर वापरून परिष्कृत केल्याखेरीज इंटरनेटवर जाऊ शकत नाही.
3) ज्यांची पाटी कोरी त्यांनी सरळ इनस्क्रिप्टचा मागोवा घेत अवघ्या दोन दिवसांत टाइपिंग शिकून घ्यावे.
असो. आपण यातील काही बाबींचा स्वतः अनुभव घेऊन कळविल्यास आभारी राहीन.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments: