* जागतिक मराठी दिवस *
कविवर्य कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "जागतिक मराठी दिवस" म्हणून
सर्वत्र साजरा करण्यात येतो .
बेंगळूरू येथील प्रकृती प्रतिष्ठान, या पर्यावरण समूहाचे प्रमुख समन्वयक श्री
धनंजय जोग यांनी महाराष्ट्र मण्डळ,बेंगळूरू यांचे सहाय्याने मण्डळाच्या
सभागृहात "जागतिक मराठी दिवस" सबंधी कार्यक्रम आयोजित केला होता. विंग कमाण्डर
वसंतराव देशमुख हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.महा.मंडळाचे अध्यक्ष श्री
राजीव पोतनीस यांचेसह सुमारे पंचवीस साहित्यप्रेमी मण्डळी कार्यक्रमास आवर्जून
उपस्थित राहिली होती
प्रथम कविवर्य कुसुमाग्रजांच्या भावचित्रास प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पुष्पहार
घालण्यात आला. श्रीमती रेखा नाईक यांनी गायिलेल्या कुसुमाग्रजांच्या एका
कवितेने कार्यक्रम सुरु झाला. श्री धनंजय जोग यांनी जागतिक मराठी दिवसाचे महत्व
स्पष्ट केले तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्याविषयीच्या आवश्यकतेबद्दलही त्यांनी
आपले विचार व्यक्त केले .
प्रमुख अतिथी श्री देशमुख यांचे "मराठी तसेच इतर राज्यभाषा वाचवा" या विषयावर
व्याख्यान झाले.अत्यंत मार्मिकपणे त्यांनी आपले परखड विचार व्यक्त करताना असे
सांगितले की आज महाराष्ट्राची मराठी तसेच कर्नाटकाची क्न्नड याप्रमाणे प्रत्येक
राज्याच्या राज्यभाषेचे संरक्षण तसेच संवर्धन होणे अगत्याचे आहे. प्रत्येक
राज्यभाषेला ख्ररा धोका हिन्दीचा आहे. हिन्दी आपली राष्ट्रभाषा नसून ती
भारतातल्या काही राज्यांची राज्यभाषा आहे. प्रत्येक राज्यात त्या त्या
राज्यभाषेचे सार्वभौमत्व अबाधित राहणे आवश्यक आहे अन्यथा हिन्दीच्या निष्कारण व
वेगाने होत असणा~या वाढत्या वापराने राज्यभाषा आपले अस्तित्वच गमावतील असा
इशारा देऊन श्री देशमुख म्हणाले की प्रत्येक राज्यातील नागरिकाने आपल्या
राज्यभाषेला मातृवत् मानून, इतर भाषांच्या होणा~या अतिक्रमणापासून तिचे
प्राणपणाने संरक्षण करायला हवे.व्याख्यानाने भारावून गेलेल्या काही श्रोत्यांनी
विचारलेल्या प्रश्नांना श्री देशमुख यांनी समर्पक उत्तरे दिली.नंतर श्री सुरेश
उदास यांनी मराठीच्या अस्मितेविषयी सादर केलेल्या स्वरचित कवितेस रसिकांची
चांगली दाद मिळाली. श्री कौशल इनामदार मुंबई यांच्या संकल्पनेने तयार करण्यात
आलेली कवी सुरेश भट यांच्या कवितेची ध्वनिमुद्रिका उपस्थित साहित्यप्रेमी
श्रोत्यांना ऐकवण्यात आली.
कार्यक्रमाच्या अखेरी श्री धनंजय जोग यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच
श्रोतृवृंदाचे आभार मानले. अशा रीतीने "जागतिक मराठी दिवस" हा कार्यक्रम संपन्न
झाला .
मंगलवार, 1 मार्च 2011
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें