From: satish rawale
Date: 2009/12/10
Subject: 'मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्याबाबतचा' निर्णय!
To: लीना मेहेंदळे
10 डिसेंबर 2009
नमस्कार!
मला मिळालेल्या माहितीनुसार, 'मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा
करण्यासाठी' शासनाने दिनांक- 6 नोव्हेंबर, 2009 रोजी निर्णय प्रसुत केला
आहे. हा 'शासननिर्णय' सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव
श्रीमती, लीना मेहेंदळे यांच्या म्हणजे आपल्या अधिकारकक्षेत घेतला गेलेला
आहे. यास्तव हा पत्र व्यवहार.
संबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत
येथे उपलब्ध आहे...
http://maharashtra.gov.in/data/gr/marathi/2009/11/06/20091106130447001.pdf
परंतु मला स्वत:ला एक मराठी भाषक या नात्याने माझ्या अल्पमती व अल्प
माहीतीनुसार खालील प्रश्न पडत आहेत. मी ते आपल्या समोर ठेवत आहे. त्यावर
आपले विचार व माहिती कळवण्याची कृपा करावी.
-----------
ह्या निर्णया मध्ये खालील बाबींच्या माहीतीची पुर्तता करण्यात आलेली नाही.-
1) शासन संस्थेने कोणत्या समितीकडे, संस्थेकडे, व्यक्तींकडे अशा
संदर्भातील 'अहवाल मागविला' होता? त्यांची नावे काय?
2) शासकिय संस्थेने कोणत्या दिवशी, कोणत्या नावाची, कोणाच्या
अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली होती? ह्या समिती मध्ये लिपीतद्न्य,
भाषातद्न्य, व्याकरणाचे जाणकार, संगणक व 'लेखन-मुद्रण विषया' तील तद्न्य,
तत्वद्न्य यांचा सामावेश करण्यात आला होता का?
3) कळफलकामध्ये एकरूपता ('स्वरूपात एकवाक्यता') आणण्यासाठी कोणते निर्णय
घेण्यात आले? म्हणजे, कळफलकाच्या कुठल्या बटनाला कोणता वर्ण राखून
ठेवायचा? व तसे केल्याने टंकनकलेच्या मदतीने 'वेगाने व विविधांगी काम
होणे' कसे शक्य होणार? हे सांगितलेले नाही.
4) मराठी साठीची आतापर्यंत वापरात असलेली बरीच सॉफ्टवेअर 'युनिकोड डाटा
एनकोडींग' च्या प्रसाराने कुचकामी झालेली आहेत. तसे असताना आता विविध
सॉफ्टवेअर मध्ये एकरूपता ('तांत्रिक व व्याकरणिक स्तरावरील एकवाक्यता')
आणण्या बाबत चे काम का बरे विचारात घेतले? उद्या युनिकोड पेक्षा
अद्ययावत नवे डाटा एनकोडींग तंत्रद्न्यान प्रचारात आले तर मराठी भाषेतील लेखन-मुद्रणाला
कोणत्या समस्या भेडसावू शकतात? हे विचारात घेतले गेले आहे का?
5) परिशिष्ठ सहा व सात नुसार, (उद्याच्या पिढीसाठी) 'शालेय स्तरासाठीची
व्यंजने' व 'सर्वसाधारण (जनतेच्या) वापराच्या व्यंजने' यांमध्ये तफावत का
ठेवण्यात आलेली आहे? त्या मागची कारण-मिमांसा काय?
- सतीश रावले
Reply -- Leena Mehendale
3:22 PM 8 मार्च 2011
या कामाचे 2 भाग पडतात. पहिला निव्वळ वर्णक्रमाशी निगडित. त्यासाठी 8-10 वर्षांपूर्वी केलेल्या कमिटीत राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र साहित्य परिषद, यांनी पुढाकार घेतला. कळफलक हा त्यांचा विषय नव्हता ( त्या काळी तो सीडॅकशिवाय इतरांना समजतही नव्हता. आजही बहुधा नाही) सीडॅकही या विषयात फारसा रस घेत नाहीत असे माझे मत आहे. पण त्यावेळी त्यांनी वर्णक्रमाबाबत आग्रह धरला होता व कमिटीच्या कामकाजात सहभागही असेल. 2009 मधे हा विषय माझ्याकडे आल्यावर आम्ही प्रयत्नपूर्वक कमिटी रिपोर्टबाबत लहानमोठ्या मुद्द्यांची तड लावून हा शासन- निर्णय निर्गमित केला. हेतु हा कि आता डिक्शनरीसारखे ग्रंथ अंतर्जालावर टाकून स्पेलचेकसाठी उपलब्ध होतील, तसे कोणत्याही प्रकारची वर्णक्रम आधारित यादी करतांना त्यांतील क्रमामधे एकवाक्यता राहील.
आता कलपाटीबद्दल बोलायचे तर मी इनस्क्रिप्ट कळपाटी वापरते, कारण ती खूप सोपी आहे व युनीकोड स्टॅण्डर्डमधे मान्यता पावलेली आहे. सीडॅकनेच ही तयार केली व आता तिचे खच्चीकरण करत आहेत, त्याऐवजी ते रोमन फोनेटिकचा प्रचार करतात. त्यालाही युनीकोड स्टॅण्डर्डमधे मान्यता आहे.
इनस्क्रिप्टला युनीकोड स्टॅण्डर्डमधे मान्यता आहे म्हणजे सगळे प्रश्न संपत नाहीत, फक्त प्रश्न क्रमांक 1 सुटला तो म्हणजे मराठी भाषा अंतर्जालावर जाऊ शकण्याचा. कृपया ही लिंक वाचावी. त्यानंतर आपण पुढे बोलू.
http://bhasha-hindi.blogspot.com/2009/02/blog-post.html
http://anu-vigyan.blogspot.com/2009/09/blog-post.html
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें