सोमवार, 25 अगस्त 2008

हिंदीला धोपटणे थांबवा

हिंदीला धोपटणे थांबवा

सालावाद प्रमाणे मराठी साहित्य संमेलन आले आणि सालावाद प्रमाणे माझी भीती या वर्षीही खरी ठरली. ती भीती होती विनाकारण हिंदीला धोपटण्याची - बडवण्याची.
नोकरी निमित्ताने महाराष्ट्रात पहिल्या प्रथम पाऊन टाकले १९७४ मधे. तेव्हा पासून हे धेपटण पहात आले आहे. त्याच बरोबर मराठीचे अवमूल्यन देखील. पण त्याला केंद्र सरकार किंवा हिंदी संस्था जबाबदार नसून मराठी सारस्वत आणि मराठी बाबतये धोरणच जबाबदार आहेत असं माझं मत आहे.
मराठीच काय पण सर्वंच भारतीय भाषांच्या गळेचेपीला खरं कारण काय आहे-तर इंग्रजीचे आपणच वारेमाप स्तोम मोजवले, इंग्रजीमधे आपले प्रविण्य दाचाविले तरच प्रतिष्ठा मिळते ही दुरावस्था त्यातूनच निर्माण झाली. त्या प्रतिष्ठेसाठी आपण सर्वांनीच इंग्रनीची काय धरली. मग मराठी भाषकडे दुर्लक्ष झालं त्याच खापर फोडायला हिंदी बरी सापडली.
पुढे वाचा
अंतर्नाद मासिकाच्या ... अंकांत प्रकाशित

कोई टिप्पणी नहीं: