महाराष्ट्र शासन
क्रमांक - संकीर्ण-2009/प्र.क्र.28/09/20-ब,
सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय,मुंबई-400032,
दिनांक- 18/3/2009.
प्रति,
सर्व जिल्हाधिकारी.
विषय : जिल्ह्यातील सायबर-कॅफे मध्ये संगणकावर मराठीतून काम करण्याची सुविधा उपलब्ध करणेबाबत.
महोदय/महोदया,
अपर मुख्य सचिव (साविस) तथा पालक सचिव, सांगली यांच्या जिल्हा भेटीच्या दरम्यान असे निदर्शनास आले आहे की, सांगली शहरात ठिकठिकाणी सायबर-कॅफे कार्यरत आहेत. परंतु या सायबर-कॅफे मधून संगणकावर मराठीतून काम करण्याची सुविधा उपलब्ध नाही. ती सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश सर्व सायबर-कॅफेना देण्यात यावेत. संगणकावर मराठीतून काम करण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोणतेही नवीन सॉफ्टवेअर घेण्याची आवश्यकता नाही. ही सुविधा विंडोज 2000, विंडोज एक्सपी, विस्टा ही ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या सर्व संगणकावर उपलब्ध आहे. ती केवळ जाणीवपूर्वक कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी, सांगली यांना शासन पत्र समक्रमांक दि. 9/2/2009 अन्वये देण्यात आलेल्या आहेत.
2. केंद्र शासनाच्या NEGP ( National E-Governance Programme ) अंतर्गत शासनामार्फत पुरविण्यांत येणा-या सेवा-सुविधा माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने संगणकाद्बारे सर्व सामान्य जनतेस त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांकडून उदा. भूमी अभिलेख कार्यालय, विक्रीकर कार्यालय यांचेकडून सर्व सामान्य जनतेस संगणकावर शासकीय सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. या स्थितीत सायबर-कॅफे हा माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने शासनाशी जनतेचा संवाद साधण्यासाठी एक महत्वाचा दुवा आहे. शासनाचे कामकाज मराठीतून करण्याचे धोरण आहे. परंतु, आपल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सायबर-कॅफेमध्ये मराठीतून काम करण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, सर्व सामान्य जनतेस या सायबर-कॅफेचा उपयोग शासकीय यंत्रणांशी संवाद साधण्यासाठी होत नाही.
3. वास्तविकरित्या संगणकावर मराठीतून काम करण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोणतेही नवीन सॉफ्टवेअर घेण्याची आवश्यकता नाही. ही सुविधा कार्यान्वित करण्याची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या वेब साईटवर http://gad. maharashtra. gov.in/marathi/ dcmNew/news/bin/inscript-typing.pdf या URL वर दर्शविण्यात आली आहे.
वरील वेब-साईट उघडत नसेल तर खाली नमूद केलेल्या अपर मुख्य सचिव (साविस) व विशेष चौकशी अधिकारी (2) यांचे http://leenamehendale.blogspot.com/2008/05/blog.post.html या URL वर देखील ही माहिती उपलब्ध आहे. वरील अनुसार संगणकावर मराठीतून काम करण्यासाठी Setting वा इनस्क्रिप्टचा वापर असे दोन टप्पे आहेत.
सेटिंग (Setting) सुरुवातील एकदाच - संगणक सुरु करा आणि पुढील एकएका खूणेवर बाण नेऊन क्रमाने टिकटिकवा (क्लिक करा.) Start > Setting > Control Panel > Regional and Language options. यानंतर खालील 1,2 किंवा 3 पैकी कोणतीही एक प्रक्रिया पूर्ण करा.
1
--> Regional and Language Options वर टिकटिकवल्यावर (क्लिक केल्यावर) त्यामधील Regional Options ही चौकट उघडेल.
--> त्यातील Customize च्या डाव्या बाजूला एका चौकटीत Drop down menu आहे.त्यातील भाषांच्या सूचीतील मराठी किंवा हिंदी हा पर्याय निवडा.
--> Ok वर क्लिक करा.
मराठी किंवा हिंदीचा पर्याय नसल्यास 2 मधील प्रक्रिया पूर्ण करा.
2
--> Regional and Language Options मधील Language या खूणेवर टिकटिकवा.
--> दुसरी चौकट उघडेल त्यात Details ह्या खूणेवर टिकटिकवा, नवी चौकट उघडेल.
--> ह्या चौकटीतल्या Add ह्या खूणेवर टिकटिकवा Add Input Language अशी खूण असलेली एक लहान चौकट उघडेल.
--> त्या चौकर्टीमधील भाषांच्या सूचीत मराठी किंवा हिंदी ही खूण निवडा.
--> Ok ह्या खूणेवर टिकटिकवा.
इथेही मराठी किंवा हिंदीचा पर्याय नसल्यास 3 मधील प्रक्रिया पूर्ण करा.
3
--> Regional and Language Options मधील Language या खूणेवर टिकटिकवा.
--> विंडोज एक्सपी ची सीडी ड्राईव्हमध्ये घाला.
--> चौकटीच्या खाली Supplemantal Language Support ह्या भागातील Install files in complex and right-to-left languages (including Thai) हा पर्याय निवडा.
--> Apply आणि Ok ह्या खूणांवर क्रमाने टिकटिकवा.
--> संगणक पुन्हा सुरु करा अशी सूचना येईल तेंव्हा संगणक बंद करुन पुन्हा सुरु करा.
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संगणकात खालच्या बाजूला असणा-या Task bar वर उजव्या कोप-यात EN अशी खूण येईल. तिथे माऊस नेऊन लेफ्ट क्लिक केल्याने HI किंवा MA ही खूण आणता येईल.
मराठी टायपिंग - अशा रितीने संगणकावर मराठी सेटिंग केल्यानंतर की बोर्डवर इन्स्क्रिप्ट पध्दतीने टाईप करावे लागते. इनस्क्रिप्टचा वापर करुन मराठी टंकलेखन कसे करता येईल, याबाबतची सविस्तर माहिती वरील URL वर दर्शविण्यात आली आहे. मराठीचे प्राथमिक ज्ञान असलेल्या कोणत्याही व्यक्तीस या पध्दतीचा वापर करुन संगणकावर मराठीतून टंकलेखन शिकण्यासाठी केवळ 2 मिनिटाचा कालावधी पुरेसा आहे. कारण इनस्क्रिप्ट ले-आऊटमध्ये मराठीतील सर्व स्वर डाव्या बाजूला व सर्व व्यंजने उजव्या बाजूला अशी लक्षात ठेवण्यासारखी अतिशय सोपी विभागणी आहे. याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
1) संगणकावर दोन मिनिटात मराठी टायपिंग करणे सहज शक्य.
2) संगणकावर जगात कोठेही वाचकास सहजपणे मराठीत वाचता येईल.
3) संगणकावर जगात कोठेही मराठीतून संवाद साधता येईल.
सायबर कॅफेंनी करावयाची कार्यवाही.
सर्व जिल्हाधिकारी यांना असे कळविण्यात येते की, त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील सर्व सायबर कॅफे धारकांना खालीलप्रमाणे सूचना द्याव्यात.
1) प्रत्येक सायबर कॅफे धारकांनी त्यांच्या सायबर कॅफेमधील सर्व संगणकामध्ये वर नमूद केल्याप्रमाणे प्रथम सेटिंग करुन घ्यावे.
2) सर्व सायबर कॅफेनी वरील URL मधून कळपाटीचे (की-बोर्डचे) चित्र 1 व 2 डाऊनलोड करुन घ्यावे व दर्शनी भागावर तसेच प्रत्येक खोलीमध्ये सर्व ग्राहकांना ठळकपणे दिसेल असा बोर्ड लावावा.
3)सर्व सायबर कॅफेनी खालीलप्रमाणे सूचना फलक लावावा.
सूचना फलक
1 आता संगणकावर सोप्या त-हेने मराठीतून काम करण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे.
2 महाजाल (इंटरनेट) तसेच इतर कागदपत्र मराठीत टाईप करण्यासाठी चित्र 1 व 2 या दोन चित्राप्रमाणे कळपाटी (की-बोर्ड) वापरा.
3 आपण मराठीत लिहिलेला मजकूर इतरांना पाठवल्यावर तो दिसेल की नाही ह्याची चिंता करण्याचं आता कारण नाही.
4 गरज असल्यास ही लिंक वाचून काढा http://bhasha-hindi.blogspot.com/2009/02/blog-post.html
-------------------
वरील पत्र अपर मुख्य सचिव (साविस) व पालक सचिव (जि. सांगली) यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
आपला
( अ. ना . कुलकर्णी )
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.
प्रत - माहितीसाठी सादर.
अपर मुख्य सचिव (साविस) व विशेष चौकशी अधिकारी (2) यांचे स्वीय सहायक. संचालक, भाषा संचालनालय, प्रशासकीय इमारत,5 वा मजला, डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ,
शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व) मुंबई-400051.
सोमवार, 6 अप्रैल 2009
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
2 टिप्पणियां:
If the governmeent is serious then
1>It must give an email address specifically dedicated to solve problems
2>setup a cell that will do the necessary search/research and provide solutions e.g.
a>Primarily for cases where the regional language option is not enabled , and cannot be enabled (solution like yudit exists as a )
b> different hardwares, newly developed OS, the pirated softwares etc
3>Provide incentives to government or private engineering college ( even moral incentives will do) to setup facilitation centres . The above mentioned state level cell can provide connectivity and make this a paid service where students who do such service are paid at a standard rate with travel expenses met.
4>This service by students be recognised as NSS if free.( NSS works under Collector's control)
5>By omission of free software, let no one create an impression it doesnot exist. All Free software Operating systems have inbuilt support for local languages and only conform to standard.
smita
The Gort. servant who have already learned marathi typing and using that method since last 15 years. is it compalsary for him to learn this inscript typing. Rather is it possible for him to achieve that much speed in inscript typing method.
एक टिप्पणी भेजें