"Shreepad Deshpande" <shreeshruti62@gmail.com> wrote:
कार्तिक शुद्ध१३, विश्वगुरु श्री गोरक्षनाथ प्रकटदिनाच्या निमित्ताने
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरू गोरक्षनाथांची महती सांगतात
तेणें योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु । तिये पदीं कां सर्वेश्वरु । अभिषेकिला ॥१७५६॥/१८.
त्यांच्याच चरणी ही सेवा समर्पित करतांना अतिव आनंद अनुभवतोय.
श्रीगुरु गोरक्षनाथप्रणित ‘नाथपंथाचे’ तत्त्वज्ञान :
‘नाथसंप्रदाय’शब्दाची प्राचीनता : परब्रह्माची, परमत्त्वाची उपासना करणारा हा पंथ सिध्दपंथ, योगमार्ग, गोरखपंथ, कानफाटा संप्रदाय, इ.नावांनी ओळखला जातो. महाराष्ट्रात १३व्या शतकापासून महानुभावीय व भागवतसांप्रदायिक ‘नाथपंथ’असा उल्लेख केला आहे. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात ‘जगामाजी श्रेष्ठ संप्रदाय नाना, कीर्ती त्रिभुवनामाजी फार | आम्ही एक दीन जाणा नाथपंथी | नीचाहुनी आथी अतिनीच |’
संतश्रेष्ठ श्रीज्ञानदेवांनी आपली दिव्य गुरुपरंपरा ज्या अभंगातून सांगितली, तो अभंग असा :-
‘‘आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा | मच्छिंद‘ तयांचा मुख्य शिष्य ॥
मच्छिद्राने बोध गोरक्षासी केला | गोरक्ष वोळला गहिनी प्रति ॥
गहिनीप्रसादें निवृत्तिदातार | ज्ञानदेवा सार चोजविलें ॥
सरलार्थ : सर्व सिद्धांचे गुरू आदिनाथ आहेत. त्यांचे मुख्य शिष्य आहेत मच्छिंद्रनाथ.-१. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना आत्मज्ञानाचा उपदेश / बोध केला व गोरक्षनाथांनी गहिनीनाथांवर कृपावर्षाव केला.-२. गहिनीनाथांच्या कृपाप्रसादाने श्रीनिवृत्तिनाथ उदार दाते / दातार होऊन त्यांनी ज्ञानदेवांना बोध रूपी अमृतातील सार ममतेने भरविले / चोजविले;
रहस्य / मर्म सांगितले.
श्रीगुरू जीवाच्या ठिकाणचे अज्ञान, अविद्या नष्ट करतात. ‘गुरू’ शब्दाची व्याख्या ‘ग इति अंध:कार: | र इति नाशयति | अंध:कारं नाशयति स गुरु: |’ अशी केली जाते. विद्यागुरू, शास्त्रगुरू, मंत्रगुरू, गोत्रगुरू इ.प्रकार परिचित आहेत. एकनाथी भागवतात गुरूंचे २७प्रकार सांगितले आहत. सदगुरू आत्म-बोध देतात. जीवाला गुरू अनेक, मात्र सद्गुरूच जीवाला मुक्त करू शकतात.
शिष्याने श्रीगुरूंना समर्पित होऊन सेवा करायची असते. तो आज्ञाधारक, कृतज्ञ, पराकोटीचा विनम्र असावा लागतो. तेच त्याच्यालेखी सर्वस्व असतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याने ज्ञानसाधना करायची असते. विद्या प्राप्त झाल्यानंतर शिष्याने त्यांना दक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचे असते.
‘आदिनाथ-मच्छिंद‘नाथ’ : आदिनाथ हे श्रीशंकरांना परंपरेत प्राप्त झालेले नाव आहे. श्रीभागवतातील ‘सती-आख्यान’ श्रीशंकर विरागी-आत्मज्ञानी असल्याचे सांगते. त्यांना श्रीविष्णूंकडून आत्मज्ञान मिळाले. ‘पिंडें पिंडाचा ग्रासु | तो हा नाथसंकेतींचा दंशु | परि दाऊनि गेला उद्देशु | महाविष्णु ॥ पंचमहाभूतांचा लय करावयाचा, हे नाथपंथीयांचे मर्म, श्रीमहाविष्णूंनी श्रीशंकरांना सांगितले. श्रीमहाविष्णू हेच आदिनाथ ठरतात. मात्र येथे श्रीशंकरांनाच ‘आदिनाथ’ म्हटले आहे.
श्रीशंकर समस्त नाथसिद्धांचे गुरू आहेत. त्यांच्यातील मत्स्येंद्रनाथ मुख्यशिष्य आहेत.
निरनिराळ्या नाथपरंपरा देशात रूढ अहेत; तरी ‘आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ’ सर्वत्र अग्रस्थानी आहेत. याबाबत एकवाक्यता आहे. श्री ज्ञाननाथ अभंगात म्हणतात, ‘आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा | मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य ॥
दुसर्या चरणातील संज्ञा ‘गोरक्षनाथ-गहिनीनाथ’ ‘आत्मज्ञान’ ‘वोळला’. नाशिवंताकडून अविनाशी तत्त्वाकडे, अनात्म्याकडून आत्मतत्त्वाकडे व आकाराकडून निराकाराकडे जाणे; जाता जाता, तेच होऊन जाणे / राहणे, हाच आत्मसाक्षात्कार होय. ‘देव पाहावया गेलो, तेथे देवचि होवोनिया ठेलो’. अशी या नाथपंथाची प्राचीनता व महत्ता श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात.
‘श्रीगोरक्षनाथ’ नाथांमधील सर्वाधिक प्रभावी, शक्तिशाली, तप:पूत, ज्ञानी योगाचार्य. विशुद्ध अध्यात्मसाधनेचे खंदे पुरस्कर्ते. गुरुमार्गाचे प्रवर्तक. शुद्ध अध्यात्मसाधनेचा प्रचार-प्रसार केला.
गोरक्षनाथांची ग्रंथसंपदा प्रचंड असून, त्यांनी श्रीचौरंगीनाथांना ‘ नमन’ केले आहे. अन्य सांप्रदायिकांवरही त्यांच्या कार्याचा ठसा उमटलेला दिसतो. आज अन्य ग्रंथांतून गोरक्षनाथांच्या कार्याविषयी अधिकची माहिती प्राप्त करून सर्वत्र ती गर्जून सांगण्याची आवश्यकता आहे.
श्रीगुरु गोरक्षनाथप्रणित ‘नाथपंथाचे’ तत्त्वज्ञान :
भारतातील श्रीगोरक्षपूर्व साधनाविश्व पारंपारिक पौराणिकहिंदू धारणा, योगपध्दती,तांत्रिकवामाचार, कर्मठ आचारनिष्ठ व्रतवैकल्ये, शाक्तांचा पंचमकार, जारणˆमारण उच्चाटना सारखे विधी व सिध्दी इत्यादींनी झाकाळून गेले होते. यज्ञयागांदि कर्मकाण्ड व तंत्रमंत्रात्मक लिंगˆयोनी यांची पुजा व त्याला अनुसरुन विकृत आचरण यांनाच मह्त्व प्राप्त झाले होते.
भक्तिविचार सुध्दा संप्रदायांच्या चौकटीत निर्जीव, नि:सत्व बनला होता. वैष्णवांचा विशुध्द प्रेमाचा धर्ममार्ग भौतिक व ऐहिक शरीरनिष्ठ सुखाचा मार्ग बनला. अशाप्रकारे विकृत साधनामार्गांनी सबंध साधनाविश्व ढवळून निघाले होते. अशा या विकृत साधनाविश्वाचे शुध्दिकरण विश्वगुरु श्रीगोरक्षनाथांनी केले.
श्रीगुरु गोरक्षनाथांच्या तत्त्वज्ञानाचा उगम ‘सांख्यमत’ असून शैव सिध्दांताच्या ३६ तत्वांचा समावेश त्यात आहे. पिंड व
ब्रह्मांड यांत समतत्वता, समपदार्थता आहे या सिध्दांतावर हे तत्त्वज्ञान आधारीत असून हे तत्व अनुभवास येणे हे
नाथतत्त्वज्ञानाचे परम ध्येय आहे.
परमात्मतत्त्वाच्या अवस्थेत शिवच सर्व विश्वाची उत्पत्ती, त्याचे पालन व त्याचे रक्षण ‘कुडंलिनी’ शक्तिद्वारा करतो. शिवाची शक्तिˆकुंडलिनी हा विचार नाथपंथाच्या तत्त्वज्ञानात आहे. ही शिवशक्ति चितशक्ति, चिदरुपिणी, कुंडलिनी जगदंबा इ . नावांनी ओळखली जाते. हीच शक्ति चराचराला व्यापून आहे. गुणपूर्णता, प्रतिबिंबता, प्रबलता, प्रोज्वलता व प्रत्यङमुखता हे तिचे पाच गुण आहेत. नाथतत्त्वात जगत हे चिदशक्तिच्या विकासाचे, विलासाचे परिणामरुप आहे तर, शिव हा अनादि, अनन्त, स्वयंसिध्द, स्वप्रकाशी, नित्यतत्व आहे.
शिवस्याभ्यन्तरे शक्ति: शक्तेरभ्यन्तरे शिव:|
अन्तरं नैव पश्यामि चन्द्रचन्द्रिकयोरिव॥
शिव व शक्ति ही दोन दिसली तरी ती एकच आहेत. एकच अद्वितीय असे परमतत्त्व शिव व शक्ति या दोन अवस्थांतून प्रकटते.शिवच शक्ति बनून सर्व दृष्ट सृष्टीमध्ये प्रकटतो, प्रस्फुरीत होतो. चंद्र व त्याचा प्रकाश जसा एकरुप तसेच शिव व शक्तिचे स्वरुप आहे. सर्व सृष्टीची निर्मिति प्रकि‘या हा शिवशक्तिचा विलास आहे.
प्रसरं भासतं शक्ति: सकोचं भासते शिव:|
तयो: संयोगकर्ता य: स भवेद्योगयोगराट् ॥
असा प्रसर व संकोच यांचे आदि व अंत्यस्थान म्हणजेच ‘साम्यावस्था’; हे साम्य भंगले की शक्तिचे स्फुरण होते, या स्फुरणातून जगाची निर्मिती होते. शक्तिचा तिरोभाव म्हणजेच ‘लय’. शक्तिचे हे सामर्थ्य व तिची शिवाशी असलेली अभिन्नता ध्यानात घेऊनच नाथयोगी शक्तिची उपासना करतात.
या उपासनेत देहाची साधना महत्वाची आहे, कारण याच देहाने परमपदाची प्राप्ती होणार असल्याने त्याची निगा राखणे महत्वाचे आहे .याची देही याची डोळा ! आत्मसाक्षात्कार प्राप्ती हे नाथपंथाचे ध्येय असल्याने इंद्रिय संयमन व मनोनिग्रहाला आत्यंतिक महत्व आहे. श्रीगुरु गोरक्षनाथांनी हठयोगाचा समावेश आपल्या योगपद्धतीत समाविष्ट केला आहे. हठयोगाचा अभ्यास वाढवून शरीरातील योगनाडया जागवून व त्या अमृतवाहिन्या बनवून साधकास ‘याची देही याची डोळा !’ मुक्तिचा सोहळा अनुभवता यावा हे श्रीगुरुगोरक्षनाथ प्रणित योगसाधनेचे प्रधान वैशिष्ठ आहे.
श्रीगुरु गोरक्षनाथ आपल्या‘सिद्धसिद्धांत पद्धति’या योगविषयक ग‘ंथात आपल्या साधनामार्गाचे वैशिष्ठ सांगतातˆ
‘पिंडमध्य चराचरौ यो जानाति | स योगी पिंड संवित्तिर्भवति ॥
ब्रह्माण्डवर्ति यत् किंचित् तत् पिण्डेऽप्यसि सर्वथा ॥
जे ब्रह्माण्डात आहे तेच पिण्डात ! हा महत्वाचा सिध्दान्त श्रीगोरक्षनाथ सांगतात. पिण्डात व ब्रह्माण्डात जे तत्त्व व्यापुन आहे त्याची एकदा अनुभूती आल्यानंतर सगुणनिर्गुण, साकारनिराकार, द्वैतअव्दैत यांच्या पलिकडचे ‘नाथब्रह्म’च उरते. कुंडलिनी जागृतीने ‘पिंण्डे पिण्डाचा ग्रासू’ हया जीवशिवसामरस्याच्या अनुभूतीचा साधनामार्ग श्रीगुरु गोरक्षनाथांनी उपदेशिला आहे आणि ह्यासाठी श्रीगुरुकृपेशिवाय तरणोपाय नाही !
वर सांगितलेल्या पिंडब्रह्मांण्डाच्या ऐक्याच्या ज्ञानासाठी, सामरस्याच्या अनुभूतीसाठी श्रीगुरु गोरक्षनाथांनी हठयोगाची साधना प्रवर्तित केली. या हठयोगास कर्म, ज्ञान, भक्ति यांची जोड दिली. तांत्रिक, शाक्त, कापालिक, अघोर, व इतर वामाचारी व विकृत साधनांच्या कचाट्यातून भारतीय धर्मसाधनेची सुटका करुन गुरुमार्गाधिष्ठीत साधनामार्ग सुप्रतिष्ठित केला.
॥ ‘ ग’ कारो गुणसंयुक्तो ‘ र ’ कारो रूपलक्षण:
‘क्ष’ कारणात् क्षयं ब‘ह्म श्रीगोरक्ष नमोऽस्तुते ॥
On Nov 2, 2017 9:11 AM, "Sudesh" <sudesh.chogle@gmail.com> wrote:
ॐ शिव गोरखश्रीगुरु गोरक्षनाथांनी सांगितलेले मर्म...पवन ही जोग पवन ही भोग,पवन ही हरे छत्तिसौ रोग |या पवन कां कोई जाणे भेव,सो आपैं करता आपैं देव ||******ब्रह्मरस मे नहाया, गोरख अलख निरंजन गायामायाजाल को भस्म करके, बभूत सरीर चढायानाथ मछिंदर गुरु ग्यानी का सपूत जगत कहलायासोहं हंस: उलट नाद से, प्राण गगन चढायासहस्रार मे शून्य गति कर, सहज स्थिती अपनायाजोगी बनके देस बिदेस घूम, नाथपंथ बतलायाकृष्णदास यह गुरु गोरख के, है नित गुण को गाया'ॐ शिव गोरख' जाप सुनके, गोरख दिल भर आया!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें