सोमवार, 31 अगस्त 2015

VNIT, Nagpur International Conference on Research for Resurgence 12-13 February 2016

International Conference on Research for Resurgence VNIT, Nagpur
12-13 February 2016, VNIT, Nagpur. च्या निमित्ताने --
सर्वप्रथम VNIT, Nagpur चे अभिनंदन -- हा आपव्या देशांत अत्यंत दुर्लक्षित राहिलेला विषय हाती घेतल्याबद्दल. पण......
हा ही एक उत्सवच रहाणार की मागील इतिहीसाचे भान ठेवत भविष्याचा वेध घेऊ शकणार -- आऱंभशूरता ठरणार की चिरंतनतेच्या दिशेने काही समर्थ पावली टाकणारी योजना यातून निघणार, हे प्रश्नचिह्न अधिकच मोठे मोठे होत आहे. दुसरेही मोठे प्रश्नचिह्न आहे -- या कार्यक्रमातून 1000 वर्षांपूर्वी आम्ही किती मोठे होतो यावरच आधारित पेपर्स वाचले जाणार की आज आपण जगाच्या तुलनेत किती मागे आहोत त्यावरही पेपर वाचला जाऊन आपल्याकडील आज असलेल्या सुविधांचा व पूर्वसंचित ज्ञानाचा एकत्रित वापर करून निकट भविष्यात काय शोध केला जाऊ शकतो यावरही चर्चा मसलत होणार ?
या कॉन्फरंस साठी बरीच पूर्वतयारी होत असणार, पण मागे काय काय झालेले आहे त्याचा शोध घेतला जाणार का
गेल्या वीस वर्षात देशांत जे काही रिसर्च झाले त्याची सूची व विषयवार सूची करून ते लगोलग एका वेबसाईटवर टाकत गेल्यास कार्यक्रमाचा किक-स्टार्ट त्यातून होऊ शकेल.
शोधक्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांतर्फे सर्व्हे-कम- फाइंडिंग असा एक उपक्रम हाती घेतला जाऊ शकतो. असे हजारो छोटे छोटे प्रकल्प आजही नितांत आवश्यक आहेत . तसेच मोठ्या संकल्पनाही आवश्यक आहेत -- उदा - भारतातील एखादी मोठी शोधसंस्था संस्कृत व्याकरण-आधारित आज्ञावली रचून त्या आधारे वाचिक कमांडवर चालणारे संगणक बनवण्याचा शोध प्रकल्प घेऊ शकते का ?
शोधक्षेत्रात मागे पडलेली भारतीय परंपरा पुन्हा वाढीस लागो ही शुभेच्छा

कोई टिप्पणी नहीं: